पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० अमन्यमानान् = (१) अपमान करणारे. = (२) अजानतः. = (३) अपूजयतः. शर्वा=शृणाति शत्रून् अनेन इति शरुर्वज्रः तेन, वज्रानें. शर्धते उत्साहं कुर्वते, अनात्मज्ञाय. अनुददाति=प्रयच्छति. शृध्यां=उत्साहनीयं कर्म. दस्योः = उपक्षपयितुः शत्रोः मराठी अर्थ - हे असुरहो ! जे मोठें पातक करणारे आहेत (महि एनो दधानान् ) व जे पुष्कळ लोकांचा ( शश्वतः ) अनादर करितात ( अमन्य- मानान् ), अथवा जे आपल्या आत्म्याला ( शश्वतः ) ओळखीत नाहींत ( अमन्यमानान् ) ह्म० जे आपली शक्ति किती अल्प आहे हें जाणत नाहीत, अथवा जे इन्द्राचे (शश्वतः ) पूजन करीत नाहींत ( अमन्यमानान् ) अशांना जो आपल्या शस्त्रानें ह्म० वज्रानें मारून टाकितो ( जघान ); आपल्याच कर्तृत्वाच्या भरंशावर जो राहतो त्याला ( शर्धते = उत्साहं कुर्वते ) त्याच्यासाठीं उत्साहास योग्य असें कोणतंच कृत्य (ट्टाध्यां - उत्साहनीयं कर्म ) ( any encouraging deed) जो करीत नाहीं; जो शत्रूंचा वध करितो (दस्योर्हन्ता ) तो इन्द्र होय. ऋचा ११ वी :-- बसलेला. पर्वतेषु क्षियन्तं=प्रच्छन्नो भूत्वा पर्वतगुहासु निवसन्तं, पर्वतामध्ये दडून अन्वविन्दत्=अन्विष्य अलभत. ओजायमानं बलमाचरन्तं.