पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ १ मराठी अर्थ - इन्द्रसदृश ( समानं ) रथावर आरूढ झालेले ( आतस्थिवांसौ [ दोन रथी ] ज्या इन्द्रालाच (चित् = तमेव इन्द्रं ) पृथक् पृथक् (नाना ) हां का मारितात ( हवेते ) तो हे असुरहो ! इन्द्र होय. २ मराठी अर्थ -- एकाच रथावर ( समानं चिद्रथं आरूढ असलेले जे [ इन्द्राग्नी ] [ यजमानांकडून ] पृथक् पृथक् (नाना ) बोलाविले जातात (हवेते) [ त्यांपैकी जो एक आहे ] तो इन्द्र होय. पहिला अर्थ चांगला दिसतो. ऋचा ९ वी :-- अवसे= रक्षणार्थ. हवन्ते - आयन्ति प्रतिमानं = प्रतिनिधिः. अच्युतच्युत्=अच्युतानां क्षयरहितानां पर्वतादीनां च्यावयिता. मराठी अर्थ - ज्याच्या [ मदती ] वांचून मनुष्यांना जय मिळत नाहीं; युद्ध करीत असतां आपले रक्षण व्हावें ह्मणून ( अवसे ) [ लोक ] ज्याला हांका मारितात ( हवन्ते ) ; जो ह्या सर्व जगाचा ( विश्वस्य ) प्रतिनिधि (प्रति- मानं ) झाला आहे [ आणि ] नाश करण्यास अवश्य अशक्य [पर्वतादिकांचेही ] ज्यानें चालन केलें (अच्युतच्युत् ) तो हे असुरहो ! इन्द्र होय. ऋचा १० वी:- • शश्वतः = (१) बहून्. = (२) आत्मानं. = (३) इंन्द्र. हें " अमन्यमानान् " ह्याचें कर्म. महि = महत्. ह्याचा अन्वय “ एनः " बरोबर. एनः पापं.