पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ ऋचा ७ वी- प्रादशि-प्रदेशने, अनुशासने, आज्ञेत. ग्रामाः = ग्रसन्ते अत इति ग्रामाः जानपदाः . सूर्य जनान= [ ज्यानें ] सूर्याला उत्पन्न केलें. कसें? तर वृत्राला मारून. नेता -प्रेरकः . मराठी अर्थ - हे असुरहो ! ज्याच्या आज्ञेत ( प्रदिशि ) [ सर्व ] घोडे आहेत, [ सर्व ] गाई आहेत, [ सर्व ] गांव आहेत व सर्व ( विश्वे ) रथ ( रथासः ) आहेत; ज्यानें [ वृत्रवध करून ] सूर्याला उत्पन्न केलें [ व ] ज्यानें उषेला उत्पन्न केलें ; ज्यानें जलाला गति दिली ( अपां नेता ) तो इन्द्र होय. ऋचा ८ वी - ऋन्दसी = (१) रोदसी. = (२) शब्दं कुर्वाणे मानुषी दैवी च द्वे सेने वा. संयती = परस्परं संगच्छन्त्यौ. विद्द्वयेते=स्वरक्षणार्थं विविधं आहूयतः . परे = उत्कृष्टाः . अवरे=अधमाश्च, उभया:= उभयविधा :. मराठी अर्थ -- परस्परनिकट असणाऱ्या द्यावा पृथिवी (संयती क्रन्दसी ), अथवा युद्धांत एकमेकींना भिडणान्या ( संयती ) [ मानुषी व दैवी ] जयघोष करणाऱ्या दोन सेना ( क्रन्दसी ) ज्याला [ आपल्या रक्षणाक- रितां ] विविध रीतींनीं हांका मारितात ( विवयेते ) [ आणि ] उत्कृष्ट ( परे ) [ व ] निकृष्ट ( अवरे ) उभयविध शत्रूही ( अमित्राः ) ज्याला बोलावितात. अंत्य दोन चरणांचे दोन अर्थ संभवतात. ते असे --