पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ आणि ( उत ) [ इन्द्र अस्तित्वांत नाहींच अशी ज्यांची समजूत आहे ते लोक ) तो नाहींच ( नैषो अस्ति ) असें त्याविषयीं बोलतात ( एनं आहु: ); जो शत्रूंना [ नेहमीं ] उद्वेगच उत्पन्न करणारा होत्साता ( विज इव उद्वेजक एव सन् 1 त्यांना ( अर्थ: ) पृष्टि देणारें जें गवाश्वरूपी धन ( पृष्टीः ) त्याचा सर्वतोपरी नाश करितो ( आमिनाति ) तो इन्द्र आहे अशी श्रद्धा ठेवा. हे असुरहो ! तोच इन्द्र होय. ऋचा ६ वी- रध्रस्य = समृद्धस्य. चोदिता = धनानां प्रेरयिता. कृशस्य = दरिद्रस्य. ब्रह्मण : = ब्राह्मणस्य. नाधमानस्य = याचमानस्य. कीरेः=स्तोतुः. युक्तग्राव्णः - अभिषवार्थं उद्यतग्राव्णः . सुशिप्रः=शोभनहनुः, सुशीर्षको वा. सुतसोमस्य = अभिषुतसोमस्य यजमानस्य. मराठी अर्थ --हे असुरहो ! जो श्रीमंत मनुष्याला ( रध्रस्य ) धन देतो ( चोदिता ); जो दारिन्याला [ ही ] ( कृशस्य ) धन देतो ( चोदिता ); याचना करणारा ( नाधमानस्य [व] स्तुति करणारा ( कीरेः ) असा जो ब्राह्मण (ब्रह्मणः ) त्याला [ ही ] जो धन देतो; जो सुन्दर अशा हनुवटीनें अथवा मस्तकानें युक्त असून ( सुशिप्र : ), [ सोमरस काढण्याकरितां] ज्याने ग्रावा ह्म० धोंडा वर उचलला आहे ( युक्तग्राव्णः = उयतग्राव्णः ) [व] सोमरस काढिला आहे ( सुतसोमस्य ) अशा [ यजमानाचे ], जो रक्षण करितो तो इन्द्र होय.