पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ अक: =अकार्षीत्. श्वघ्नीश्वभिर्मृगान्हन्तीति श्वष्नी व्याधः. जिगवान् जितवान्. लक्षं लक्ष्यं. आदत्=आदत्ते. अर्थः-शत्रूची. पुष्टानि - समृद्धानि. मराठी अर्थ--हे असुरहो ! ज्याने ह्या सर्व (विश्वा) नश्वर भुवनांना ( च्यवना ) स्थिर केलें; ज्यानें निकृष्ट ( अधरं ) [ आणि ] नाशाला कारणी भूत ( दासं = उपक्षपयितारं ) अशा वर्णाला ( race ) नरकामध्यें ( गुहा ) अथवा गुहेमध्ये टाकून दिलें ( अकः ); जो, एकाद्या व्याधाप्रमाणे ( श्वघ्नीव ), आपलें लक्ष्यं भेदितो ( लक्ष्यं जिर्गावान् ) [व] शत्रूची (अर्थ: ) समृद्धि (पुष्टानि ) हरण करितो ( आदत्-आदत्ते ) तो इन्द्र होय. ऋचा ५ वी.- कुह-कुत्र. घोरं = शत्रूणां घातकं. ईम्- - - पूरण:. हा पूरण शब्द ( expletive) आहे. एनं = एनं इन्द्रम् . पुष्टीः = पोषकानि गवाश्वादीनि धनानि . विज इव उद्वेजक एव सन्. इवशब्दः एवार्थे. आमिनाति = सर्वतो हिनस्ति. श्रदस्मै धत्त = तो इंद्र आहे असा विश्वास धरा. मराठी अर्थ:- [ ज्यांना इन्द्र दिसत नाहीं ते ] ज्या शत्रुविघातक; ( घोरं ) [ इंद्रा ] विषयीं तो कोठें आहे ( कुह सेति ) अशी पृच्छा करितात