पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ अपधा=[ वलकर्तृकात् ] तिरोधानात्. .66 निरोधात् " असा पीटर्सनचा पाठ आहे. अश्मनोः=अश्नुते व्याप्नोति अंतरिक्षं इति अश्मा मेघः तयोः [ मध्ये. ] अंतःमध्ये. जजान = उत्पादयामास. संवृक् = वृणक्ते हिंसार्थस्य क्विपि रूपं . समत्सु=संभक्षयन्ति योद्धृणां आयूंषि इति समदः संग्रामाः तेषु. मराठी भाषान्तर-- हे असुरहो ! ज्यानें मेघांना (अहिं ) फोडून ( हत्वा ) प्रवाही ( सप्त ) अशा जलाला (सिन्धून् ) वाहूं दिलें ( अरिणात्- त्रैरयत् ), अथवा सात ( सप्त ) ज्या [ मुख ] नद्या ( सिन्धून् ) त्यांना वाहूं दिले; ज्यानें वलनामक असुरानें [ हरण करून नेलेल्या ] धेनूंना ( गाः ) त्यां- च्या गुप्त जागेपासून (अपधा=तिरोधानात् ) सोडविलें (उदाजत्-निरगमयत्); ज्यानें दोन मेघांच्यामध्यें ( अश्मनोरन्तः ) [ विद्युद्रूप] अग्नि उत्पन्न केला ( जजान ) ; जो संग्रामांमध्ये ( समत्सु ) शत्रूंना संहारकारक होतो ( संवृक् ) तो इन्द्र होय. ऋचा ४ थी :- च्यवना - नश्वराणि भुवनानि. कृतानि = स्थिरीकृतानि. अन्वय- येन इमा विश्वा च्यवना [ स्थिरी ] कृतानि. दासं = (१) शूद्रादिकं. हा अर्थ घेऊं नये. - = (२) उपक्षपयितारं. अधरं - निकृष्टम्. गुहा गुहायां, गूढस्थाने नरके वा.