पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आअस्थु :- २२

अतिष्ठन्ति, प्रानुवंति. परियन्ति=परितो गच्छन्ति, व्याप्नुवन्ति.

सद्यः = तदानीं एव, एकेन अहा. पहिल्या दोन पंक्तींचे तीन अर्थ होतात ते येणेप्रमाणे- -- १ मराठी अर्थ - कल्याणकारक (भद्रा ), हरण करणारे ( हरित: ), विचित्र अवयवांनी युक्त ( चित्राः ), आपल्या मार्गाने जाणारे अथवा शबल वर्ण किंवा नीलवर्ण धारण करणारे ( एतग्वाः एतं एतव्यं गन्तव्यं मार्ग गन्तारः, एतं शबलवर्ण नीलवर्ण वा प्राप्नुवन्तः ) [आणि] अनुक्रमाने सर्वांनी स्तुत्य ( अनुमाद्यास: ) असे सूर्याचे अश्व ( अश्वाः ) हे - २ मराठी अर्थ -- कल्याणकारक ( भद्राः ), विश्वाचें व्यापन करणारे ( अश्वाः ), हरण करणारे ( हरित: ), विचित्र अवयवांनी युक्त ( चित्राः ) [ आणि ] अनुक्रमानें सर्वांनी स्तुत्य ( अनुमाद्यासः ) असे सूर्याचे अश्व ( एतग्वाः ) हे मराठी अर्थ - कल्याणकारक ( भद्राः ), सर्वव्यापी ( अश्वाः), आश्च• र्यकारक ( चित्राः ), आपल्या मार्गाने जाणारे अथवा शवलवर्ण किंवा नील वर्ण धारण करणारे ( एतग्वाः - एतं एतत्र्यं गन्तव्यं मार्ग गन्तारः, एतं शबलवर्ण नीलवर्ण वा प्राप्नुवन्तः ) [ आणि ] अनुक्रमानें सर्वांनी स्तुत्य ( अनुमा- द्यासः ) असे सूर्याचे रसहरणशील असे रश्मि ( हरितः ) हे शेवटल्या दोन पंक्तींचा मराठी अर्थ -- आमच्याकडून नमस्कार केले जाणारे असे होत्साते ( नमस्यन्तः ) नभःस्थलावर ( दिवः पृष्ठं ) प्राप्त होतात ( आअस्थुः ) [ आणि नन्तर ] लगेच एक दिवसांत ( सद्यः ) द्यावापृथिवींना व्यापून टाकितात ( परियन्ति परितो गच्छन्ति, व्याप्नुवन्ति इत्यर्थः) -