पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० ही ऋचा तीन तऱ्हेने लावितां येते. पहिल्या दोन तन्हांमध्ये अन्वय एकच आहे परंतु अर्थासंबंधानें फरक आहे. तो अन्वय असाः-- यत्र देवयन्तः नरः युगानि वितन्वते [ तां] रोचमानां देवीं उषसं, मर्यो न योषां, सूर्यः पश्चात् अभ्येति भद्रं प्रति भद्राय [ स्तुमः ]. ह्या वाक्याचे दोन अर्थ होतात ते येणें प्रमाणे:- - १ मराठी अर्थ --जी प्राप्त झाली असतांना ( यत्र यस्यां उषसि जातायां ), देदीप्यमान जो सूर्य त्याचें यजन करण्याची इच्छा करणारे ( देवयन्तः ) यज- मान (नर: ) अग्निहोत्रादिक करें ( युगानि ) करितात, ( वितन्वते ) [ अशा त्या ] तेजस्वी ( रोचमानां ) व दानादिगुणयुक्त ( देवीं ) अशा उषेला (उषसं) अनुलक्षून, ज्याप्रमाणें एखादा मनुष्य एकाया सुन्दर स्त्रीला अनुलक्षून जावा तद्वत् ( मर्यो न योषां, ) तिचा प्रादुर्भव झाल्यानंतर ( पश्चात् ) सूर्य हा गमन करितो. २ मराठी अर्थ -- जी प्राप्त झाली असतांना ( यत्र-यस्यां उपसि जा- तायां ) देवयागाकरितां धनाची इच्छा करणारे ( देवयन्तः ) यजमानांचे सेवक ( नरः--यजमानपुरुषाः ) हे, नांगराचें जूं ( युगानि ) [ जोडून, नांगर ] तयार करितात ( वितन्वते ) [ अशी त्या ] तेजस्वी ( रोचमानां ) इ. इ. " भद्रं प्रति भद्राय [ स्तुमः ]" हें वाक्य दोन्ही ठिकाणी आहे व त्याचा अर्थ दोन्ही स्थली एकच आहे. तो असा - कल्याणकारक असें कर्मफळ मिळावें ह्मणून (भद्रा ) कल्याणकारक अशा सूर्याला ( भद्रं प्रति ) [ आह्मी स्तवितों. ह्म० कल्याणकारक सूर्याचें आह्मी स्तवन करितों. ] ही ऋचालाविण्याची आणखी एक तन्हा आहे ह्मणून सांगितलें. त्या वेळी. अन्वय व अर्थ येणें प्रमाणे लावावा:-- अन्वय-यत्र देवयन्तः नरः युगानि [भूत्वा ] भद्रं भद्राय प्रतिवित न्वते [तां] रोचमानां देवीं उपसं, मर्यो न योषां, सूर्यः पश्चादभ्येति.