पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिरवाईनं नटलेला. सर्वत्र पॅसेज, गार्डन, बालक्रीडांगण, कॉमन प्लेस असतेच. प्रत्येक सेक्टरमध्ये शाळा, ग्रंथालय, व्यापार संकुल, मेट्रो स्टेशन असतंच. सारा विकास सुनियोजित व कालबद्ध.
वाहतूक व्यवस्था
 जागोजागी आखीव-रेखीव रस्ते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडी, हिरवळ, फुलांचे ताटवे. अंतराअंतरावर दिशादर्शक फलक. सर्वच सिग्नल चोवीस तास. पोलीस कुठेच नाहीत. हिरवा दिवा असल्याशिवाय कोणी चौक वा रस्ता ओलांडत नाही. पायी चालणान्याचा कोण आदर ! रस्त्यांची आखणी व बांधणी भविष्यलक्ष्यी असते, त्याचं एकच उदाहरण देतो. चॅगी हा सिंगापूरचा एकमेव विमानतळ. तोही आंतरराष्ट्रीय दर्जाचा व मानांकन मिळविणारा. त्या विमानतळाकडे जाणारा रस्ता विशाल, चौपदरी आहे. तो मध्ये फुलांच्या कुंड्या ठेवून दुभागला आहे. याच रस्त्यावर कुंड्या कशा ? असं ड्रायव्हरला विचारल्यावर त्यानं सांगितलं की, विमानतळावर काही आणीबाणी निर्माण झाली तर कुंड्या कडेला ठेवल्या की क्षणात रस्त्याचं रूपांतर रनवेमध्ये करता येतं व आजूबाजूला रिकाम्या जागेत तात्पुरतं विमानतळ चालविता येऊ शकतं.
 सिंगापूरला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस महत्त्व आहे. इथे विमान, बस, रेल्वे, मोनोरेल, रोप वे, जहाज, टॅक्सी व खासगी वाहने आहेत. खासगी मोटारी कमी. व्यक्तिगत मोटारी वापरणं तिथं डिलक्स सिंबॉल ! खासगी मोटारीवर भारी कर अशासाठी की रस्त्यावर भाऊगर्दी होऊ नये. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आढळली.

 तिथे सिंगापूरभर फिरणारी लोकल मेट्रो आहे. ती देशाला (शहर म्हणजेच देश आहे!) उभी आडवी चार-पाच मार्गांनी जोडलेली. गाडी पाच-सहा डब्यांचीच. स्वच्छ, सुंदर, वातानुकूलित. येणा-या स्टेशनची उद्घोषणा होते. चार भाषांतून स्टेशन कुठल्या बाजूला येणार ते दिव्यावरून कळतं. अधिकांकडे प्री-पेड स्मार्टकार्ड असतं. ते बस, रेल्वेत सर्वत्र चालतं. ते तुमचं तुम्ही टॅप करायचं. रेल्वे, बसमध्ये कंडक्टर असत नाही. लोक तिकिटाशिवाय प्रवास करीतच नाहीत. ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, बालकधारी माता, अपंगांना प्रत्येक दाराजवळच्या चार कोप-यांची चार आसने आरक्षित; विशेष म्हणजे तेथील लोक स्वत: उठून आरक्षण पाळतात. मला मेट्रो, बसमध्ये एकदाही उभं राहावं लागत नाही. तरुण हे आरक्षण

सामाजिक विकासवेध/३४