पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवसमाजनिर्मितीचा 'सिंगापूर आदर्श' अनुकरणीय


 भारत खंडप्राय देश आहे; तर सिंगापूर एक छोटंसं बेट. भारताप्रमाणे सिंगापूर बहुधर्मीय, बहुभाषी देश आहे. भारत गरीब देश, तर सिंगापूर श्रीमंत. पन्नासपट श्रीमंत. आपले पन्नास रुपये दिले की आपणास एक सिंगापुर डॉलर मिळतो. मला या देशाची मोठी गंमत वाटते नि आश्चर्यही! देशाच्या जमिनीचा १.५ टक्के भागच शेतीचा. चारीही दिशांनी (खरं तर संपूर्ण देश!) समुद्राने वेढलेला. लोकसंख्या अवघी ५४ लक्ष. क्षेत्रफळही अवघे ६८२ चौरस मीटर (गोव्यापेक्षा छोटा, एक षष्ठांश) एका अक्षांश, रेखांशात सामावलेला देश. बारमाही पाऊस. एकमेव नदी. प्यायचं पाणी देशात नाही. ते शेजारच्या मलेशियातून येतं. धान्य म्यानमार (ब्रह्मदेश), थायलंडमधून. पेट्रोल अरब देशातून. हा देश दुसरंतिसरं काही नसून ते एक बेट आहे. खोल समुद्राचं वरदान लाभल्यामुळे ते एक नैसर्गिक बंदर आहे. केवळ याच एका वरदानावर हा देश उभा आहे. अमेरिका, जपान, युरोपची ती महत्त्वाची उतारपेठ असून आशियाला लागणारा ८0टक्के माल एकटा सिंगापूर निर्यात करतो. तेल उत्पादन होत नाही; पण तेलशुद्धीकरण करून जगभर पाठविणारा प्रमुख देश. करमुक्त बंदर व पर्यटन केंद्र म्हणून हा देश विकसित झाला तो त्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर. ९ ऑगस्ट, १९६५ रोजी स्वतंत्र झालेला हा देश. तिथे स्वातंत्र्यापासून आजअखेर एकाच पक्षाचं ‘पीपल्स अॅक्शन पार्टीचे राज्य आहे. ली क्वान यू हा या देशाचा पहिला पंतप्रधान. सलग २५ वर्षे (पाच निवडणुका) त्यानंच जिंकल्या. सन १९९० ला राजकारण निवृत्ती घेऊन त्याने मुलाकडे राज्यकारभार सोपविला. गेली २३ वर्षे तोच मुलगा पंतप्रधान. निवडून यायचं रहस्य काय ? गतिमान विकास, कायद्याचे कठोर पालन, भ्रष्टाचारमुक्त शासन (जगातला तो सर्वांत कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत पाचवा आहे, तर भारत

सामाजिक विकासवेध/३२