पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळाच्या उदरात बंदिस्त ... तिकडे नवी मिसरुंड फुटू लागतात... नवे ऋतु झरू लागतात. झुरायचं वय येतं, झुलायच्या वयापाठोपाठ. मागोमाग... शहाणी पिढी ती, जी पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणत शिकत राहते. शिकते, सवरते, शहाणी-सुरती होते, सावरते ती! यंदा तुमचं कर्तव्य असेल तर हे सारं इतिहासभान हवं !
  मी पाहतो आहे, व्यक्तिस्वातंत्र्य, सोशल नेटवर्किंग, शिक्षणाचं लांबणं अन् शिक्षणासाठी लांब जाणं, राहणं या सर्वांतून जीवनजोखीम रोज वाढते आहे. टू व्हीलर्सवर पर अवर एटी केएम पळताना ... रेस करताना परिसरावर ट्रेसिंग पेपर ओढला जातोय ! बाईकस्वार हेल्मेट घालून तर बँक सिटर स्कार्फ, सनकोट लेवून आइडेंटिटी चेंज करून जगाला चेंजिंग रूम बनवू पाहते आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जितक्या गतीनं जगाला मागे टाकून पुढे सरसावू पाहता तेवढा धोका वाढतो आहे. मागे पडणारे विजेचे खांब १००० वॅटचा विजेचा दाब घेऊन कवटी दाखवत, दात बिचकत ‘सावधान ऽऽ'तेचा इशारा देत असतात, तो इग्नोर करू नका. ओव्हरटेक नुसतं तुम्ही वाहनांचं नसता करत. घेतलेले संस्कार, जपलेली नाती, वाट पाहणारी घरं, आपली माणसं... सारं सारं तुम्ही भन्नाटपणे ओव्हरटेक करत ओन्ली व्हायला सरसावता; पण लक्षात ठेवा... हे। ओन्ली होणं शेवटी लोन्ली होणं असतं. मग फक्त म्युनिसिपालिटीची शववाहिकाच ती काय तुमच्या पाठीशी किंवा हायवेची इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स... पोलीस पंचनाम्यात नोंद असते, “वीस वर्षांचा एक पुरुष । जीव व अठरा वर्षांचा स्त्री जीव अपघाती मृत सापडला. मोबाईलवरून आप्तेष्टांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सर्वजण नॉट रिचेबल होते. सबब, जीवनमुक्ती संघटनेस अंत्येष्टीची वर्दी दिली. मेहरबानास हुकुमार्थ सादर !' म्हणून तर जागोजागी असतात. स्पीड ब्रेकर ... ते न पाहता मारुती उड्डाण केलं की हीच गत होणार ना !

 रस्त्यावरच चेक नाके असतात असे नाही. चेक नाके घरी, दारी, बाजारी सर्वत्र असतात. ते स्कार्फ ओढून किती चुकवणार? दुस-याला फसवायला जाऊन आपलीच फसगत होते ना? माला डी, मूडस्नी कामसूत्र सांभाळता येत नाही. त्यासाठी तर ‘मंगळसूत्र' जन्मलं होतं. लाईफ कधीच टोल फ्री असत नाही, नव्हतं नि होणारही नाही ! स्वयंवर, संवाद, देवघेव, इंटरेक्शननी शक्य असतं. प्रत्येक वेळी पळून, चोरून लग्न करायची गरज नसते. सांगा, ऐका, सहन करा. जर पालक जात, धर्माच्या हत्ती-घोड्यांवरून

सामजिक विकासवेध/२९