पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युवक हो, तुम्हाला तरायचंय की तरंगायचंय?


 आज ३० मे, २०१३. एच. एस. सी. निकाल लागला. अनेक परिचित, पाहुणे, मित्र, स्नेह्यांचे फोन येत राहिले.
 शिल्पाला ८२ टक्के गुण मिळाले. आई थोडीशी नर्व्हसच होऊन बोलत होती. पनवेलहून वडील मात्र समाधानी होते. मुलगी बेहद्द खूश होती. कारण ऐन परीक्षेच्या काळातच घरी आई-बाबांमध्ये शीतयुद्ध, गृहयुद्ध, गृहकलह सारं सुरू होतं ... त्या वेळी मी तिला एकच गोष्ट समजावत राहायचो. आई-बाबांकडे लक्ष देऊ नको. तू नि तुझा अभ्यास. शिल्पा सांगत होती,... आजोबा, तुमचा फंडाच उपयोगी पडला. मी बी. कॉम. करणार. सायमलटनस्ली सी. एस.ची एक्झाम देत राहणार.'
 कपिलची आई सुनीताचा फोन कोल्हापुरातूनच. ‘दादा, कपिलला ५५ % मार्क्स पडले बगा. मार्काला काय पुजायचंय... त्यापेक्षा तो भाषण करतो, कविता लिहितो, मंडळाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो, माणसांत असतो हेच मला आवडतं. कपिलच्या पप्पांना सांगा जरा समजावून. दुस-याच्या मुलांच्या मार्काची तुलना करून आपला कमीपणा का मानायचा?'
 शिरोड्याहून लिनूची मम्मी बोलत होती... लिनूला ६० परसेंटेज पडलं. ती इंटिरिअर डिझायनर होणार. तिच्या बाबांची प्रतिक्रियाच नव्हती. त्यांच्या लेखी हे खातं गृहमंत्र्यांकडे... हे नामानिराळे.

 हे नि असे अनेक फोन. त्यातली चर्चा, संवाद यातून माझी स्थूल निरीक्षणे अशी ... घरी निर्णयाचं होकायंत्र आईच्या हाती आलंय. मुलांच्या करिअर्सच्या कल्पना बदलू लागल्यात. त्या नोकरीकडून व्यवसायाकडे झुकू लागल्यात. मुलांना मार्काचं वैयर्थ उमजू लागलंय. जीवघेण्या स्पर्धेत शहाणपणाची सरशी त्यांना समजू लागली आहे. पुरुष पालक ‘पालक भूमिकेत बॅकफूटवर गेलेत. शाळा, शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लेखी

सामाजिक विकासवेध/१६