नवऱ्या मुलानं सगळं आपल्या आपणच ठरवून टाकायचं ही काय रीत झाली ? त्याच्या घरात कुणी वडीलधारं नाही की काय? आणि मुलगा हुंडा मागत नाही म्हणून तिचा जीव भांड्यात पडला असला तरीसुद्धा ही गोष्ट काहीतरी अस्वाभाविक आहे असं तिला वाटलं. चांगलं सुखवस्तू कुटुंब, जमीनजुमला असलेलं. धाकटया भावाला चांगली उत्तम पगाराची नोकरी. एकुलत्या एक बहिणीचं लग्न झालेलं. त्यामानाने ज्योतीची बाजू फारच लंगडी होती. असं असताना त्यानं तिला हुंड्याशिवाय का पत्करावं ? मुलात काहीतरी दोष असला पाहिजे.
ज्योतीला हसूच आलं. तिला रामचं सरळ मुद्याला हात घालणं आणि स्वतंत्र वृत्ती आवडली. माझा हुंड्यावर विश्वास नाहीये, पण...असं म्हणून आईबापांच्या आड लपून हुंडा मागणान्या शेळपटांच्यातला तो नव्हता. आणि तिला त्याचं रूपही आवडलं. उंच - ती फक्त पाच फूट दोन इंच होती त्यामुळे साडेपाच फूट उंचीचा माणूस तिला चांगला उंच - निच वाटला - सडपातळ, काळासावळा आणि खूप दाट केसांचा. अगदी देखणा म्हणण्यासारखा नसला तरी ती तरी कुठे मोठी सुंदर लागून गेली होती ! शिवाय सुंदर पुरुष बायकी दिसतात असं तिचं मत होतं.
लग्न म्हटलं की ज्योतीच्या मनात भुतं उभी रहायची. तिचं एक दुःस्वप्न होतं की एका स्थळानं आपल्याला पसंत केलंय आणि भला मोठा हुंडा थाटामाटात लग्न, अशी मागणी केलीय. ना रूप, ना रंग, ना बापाची इस्टेट, अशा परिस्थितीत आहे ते स्थळ हातचं घालवलं तर मुलगी बिनलग्नाची राहील म्हणन आई सगळ्या मागण्या कबूल करून बसलीय मग अर्थातच ज्योतीच्या काका-मामा समोर हात पसरतेय. आपल्याला या सगळ्याची घृणा आहे, पण सरळ मी हे लग्न करणार नाही, असं म्हणण्याची धमक नाहीये.
प्रत्यक्षात गोष्ट कधी इतक्या थरापर्यंत आलीच नव्हती. ज्या डझनभर स्थळांनी तिला पाहयलं होतं त्यांनी ताबडतोब नाही म्हटलं होतं. याचं ज्योतीला फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं.
पान:साथ (Sath).pdf/38
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३२ : साथ