असलीस तर आम्ही थोडा वेळ थांबतो. एकत्रच जाऊ.”
" मी वेगळ्या होटेलात आहे."
" असं ? कुठल्या ?"
" गुलमोहोर." विनीचे डोळे विस्फारले. सुदैवाने अतुलने विनीचा हात धरून तिला ओढूनच नेलं म्हणून ज्योतीला आणखी काही खुलासा देत बसावं लागलं नाही.
विनी मागे वळून म्हणाली, " बाय, ज्यो. चांगली विश्रांती घे. तू फारच ओढल्यासारखी दिसत्येयस."
लोकं किती भोळे असतात ह्याची ज्योतीला गंमत वाटली. तुमची प्रकृती उत्तम असली तरी तुम्ही आजारी आहात असं नुसतं सुचवलं की तुम्ही ओढल्यासारखे, खराब झाल्यासारखे दिसायला लागता.
त्या रात्री विनी गुलमोहोरमधे उगवली.
" काय चाललंय काय, ज्यो?"
" म्हणजे?"
" तू सांगितलंस ते मला खरं वाटेल अशी तुझी खरंच कल्पना होती का? तू आजाऱ्यासारखी दिसतसुद्धा नाहीस."
ज्योतीला हसू आवरेना. " आणि मला वाटलं तू फसलीस म्हणून."
" मी तुला काही आज ओळखत नाही, ज्यो. पण अतुलची घाई चालली होती आणि बाजारात काय बोलायचं, म्हणून मी निवांत भेटायला आले."
ज्योतीनं एक मोठा सुस्कारा सोडला.
" तुझ्या खाजगी आयुष्यात मुद्दाम नाक खुपसायची माझी इच्छा नाहीये. तुला काही सांगायचं नसलं तर सांगू नको. फक्त तुला काही हवं असलं, माझी मदत हवी असली तर तू कधीही मागू शकतेस एवढं लक्षात ठेव."
विनी दुखावली होती तिला उडवून लावण्याचा ज्योतीचा इरादा नव्हता, पण खाजगी आयुष्याबद्दल कुणाशीही बोलायला
पान:साथ (Sath).pdf/167
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६०: साय