पान:साथ (Sath).pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जेवणाची ऑर्डरही देऊ नको. मी सगळी व्यवस्था करतो. पाहुणे हजर होईपर्यंत तू बैठकीच्या खोलीत येऊसुद्धा नको. मग झालं ?"
 खरं म्हणजे हया वरच्यावर दिल्या जाणाऱ्या पार्ट्यांची तिला कधीच फारशी तोशीस पडत नसे. तिने प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर देखरेख केली पाहिजे, असा त्याचा कधीच अट्टाहास नसे. बाहेरून पदार्थ मागवले तर त्याच्या खर्चाबद्दल त्याने कधी कूरकर केली नाही. पण आज तिचा मूड नव्हता, तो लोकांना तोंड देण्याचा आणि हजारदा ऐकलेल्या गोष्टी नव्यानेच ऐकत असल्यासारखा चेहरा करून ऐकायचा आणि त्यांना हजारदा दिलेला प्रतिसाद पुन्हा एकवार उत्साहाने द्यायचा. पण हे रामला पटण्याची काही शक्यता नव्हती. पार्टीत भाग न घेणं त्यानं फक्त आजारपणाच्या सबबीवर ऐकून घेतलं असतं, आणि नसलेली डोकेदुखी पुढे करण्याची तिची तयारी नव्हती.
 तिच्या मनात आलं, आमची सगळीच भांडणं, सगळेच मतभेद केवळ मी कामामुळे थकलेली, चिडचिडी झालेली आहे म्हणून झाले असं खरंच का वाटतं याला ? तो इतका गेंड्याच्या कातडीचा आहे ?
 ती म्हणाली, "झालं काही नाही. फक्त हयापुढे तुझ्याबरोबर राहणं अशक्य आहे मला."
 "काहीतरी झालंय नक्कीच. माझ्या हातनं काही तरी झालंय, किंवा करायला पाहिजे ते काहीतरी केलं गेलं नाही, त्यामुळे तू दुखावली गेलीयस. काहीही असलं तरी तुला माहीताय, ज्यो, तुला वाईट वाटेल असं मी जाणूनबुजून कधी काही करणार नाही. तर जो काही अपराध माझ्याकडून घडला असेल त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. आता झालं ?"

 " तसं काही नाहीये रे !" ती हताशपणे म्हणाली. क्षणभरात तो म्हणणार होता, तू दमलीयस. झोप आता. उद्या दिवसाउजेडी आपण बोलू काय ते. ते त्यानं म्हणायच्या आत तिनं एक शेवटचा प्रयत्न केला. " राम, तुला माहीताय, हा चर्चा करून किंवा क्षमा मागून सुटण्यातला प्रश्न नाहीये. हा निव्वळ पोरकट हट्ट

साथ : ७