पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याला हाताला धरून जवळ आणत. लोकमान्य टिळकांचा खरा 'संदेश' आबासाहेबानी पुरापुरा जाणला होता.
 पुढे पुढे आबासाहेबांच्या वैद्यकीचा आणि गणेशोत्सवाचा लौकिक महाराष्ट्रभर पसरला. त्यांच्या वैद्यकी ज्ञानाची प्रचीती मोठमोठ्या गवयाना, पुढाऱ्याना येऊ लागली. त्यांच्या विषयींच्या कथा-दंतकथा सर्वत्र चवीने सांगितल्या जाऊ लागल्या, तेव्हापासून आबासाहेबांच्या प्रेमाखातर मोठमोठे नामांकित गवई, त्यांच्या गणपती- अत्सवात येऊन आवर्जून गाऊ लागले. कोणकोण गाऊन गेले, मैफली गाजवून गेले त्याची मोजदाद करणेच कठीण. अस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ, कागलकरबुवा, कडलासकरबुवा, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, शंकरराव सरनाईक यांपासून तो साक्षात् बालगंधर्व, गंगूबाई हनगल, मोगूबाई कुर्डीकर यांचेपर्यंत अनेक बुजुर्ग, सांगलीत आबासाहेबांमुळे येऊन गाऊन गेले. त्या मंडळींचे स्वर्गीय गायन ऐकून सांगलीकर मंडळी धन्य झाली. राजेमहाराजांच्या राजवाड्यातून, , मोठमोठ्या मैफलीतून, गाणारी मंडळी, आबासाहेबांमुळे सर्वसामान्य लोकाना ऐकायला मिळाली.
 हा एक मोठा चमत्कार होता. आणि तो घडायला एक प्रसंग कारणीभूत झाला. त्याचं असं झालं:
 गानमहर्षी अल्लादियाखाँसाहेबाना अचानक आजार जडला. एकसारखी धाप लागायला लागली. तरूणपणी त्याना कुस्तीचा नाद होता. एका अटीतटीच्या कुस्तीप्रसंगी काही बाचाबाची झाली. आणि प्रतिस्पर्ध्याने खाँसाहेबांच्या छातीवर एक जोरदार गुद्दा लगावला. . काही काळ ते बेशुद्ध झाले. तरूण वय असल्याने त्यावेळी खाँसाहेब त्या गंडांतरातून बचावले. पण पुढे त्या प्रसंगाचा त्रास जाणवू लागला. एकसारखी धाप लागू लागली. थोडा वेळ सुद्धा गाता येईना. किंबहुना थोडा वेळसुद्धा गाता उपयोगी नाही असाच डॉक्टरी सल्ला पडला. पालपिटेशन्स वाढली. एक असाध्य रोग असंच त्यांच्या आजाराचे स्वरूप (निदान त्या काळात तरी) बनले.

 त्याच सुमारास किंवा काही काळ आधी, वर अल्लेखलेल्या गुलामअद्दीनचा किस्सा, आबासाहेबानी मरणाच्या दाढेतून त्याला कसा ओढून काढला, याची कथा कोल्हापुरात सर्वत्र बोलली जात होती. खाँसाहेबांच्या निकटवर्तियाना साहजिकच शेवटचा अपाय म्हणून आबासाहेबाना दाखवावं असं वाटू लागलं. पण “शहाण्या डॉक्टरकडून आलेलं मरण परवडलं पण वैद्यबिद्य काही नको" असं काही त्यांच्या चाहत्यांचं मत पडलं. पण अखेरीस डॉक्टरी अपचारांचा काहीही अपयोग नाही, त्यानीहि आशा सोडल्यासारखे झाले तेव्हा मात्र त्यांचेच एक डॉक्टर चाहते, सर भालचंद्र भडकमकरसारख्या डॉक्टरानी "सांबारे वैद्यांकडे अवश्य जा” असे सांगितले.


सांगली आणि सांगलीकर................................................................ ..७३