पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परीक्षा होई. त्यांच्या या अभ्यासाची यथार्थ कल्पना नसणारे लोक मात्र त्याना हातगुण आहे असे समजत. आबासाहेब औषधाची फी घेत नसत. मात्र त्यांच्या असंख्य रूग्णांना, आबासाहेबांच्या गणेशोत्सवात, आपली सगळी फी हक्काने परत करण्याची संधी मिळे. अत्सवात ज्वारी, तांदूळ, गूळ, शेंगदाणे, हरभराडाळ, तूरडाळ यांच्या थप्प्या लागत.
 आबासाहेब सांबारे यांचेकडील गणपती- अत्सव हे एक मोठेच प्रकरण होते.
 आबासाहेब हे स्वत: मोठे गणेशभक्त होते. त्यांचा मित्र परिवार अफाट. सर्वजण मिळून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करीत. एकदा गप्पांच्या ओघात, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आणि सार्वजनिकपणे साजरा करावा, अशी टूम निघाली. ही गोष्ट आहे १८९८-९९ सालातील. कदाचित् लो. टिळकानी पुण्यात सुरू केलेल्या शिवजयंती आणि गणेशोत्सव चळवळीचे लोण सांगलीत पोचले असेल. अत्सव मोठा करायचा तर गणपतीची मूर्तीपण मोठी हवी. मग सात फूट उंचीचा शाडूचा गणपती करण्यात आला. दुर्दैवाने गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी चाचणी घेण्यासाठी बाहेर काढताना मूर्ती भंगली. सर्वजण निराश झाले. आता गणपतीची मूर्ती बनवायची केव्हा आणि प्रतिष्ठापना करायची तरी ती कधी? मग सर्वानुमते शक्कल काढण्यात आली. चार पाच दिवसात गजाननाची मूर्ती बनवून, दशमीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करायची आणि अनंतचर्तुदशीला विसर्जन करायचे.
 तेव्हापासून आजतागायत हीच प्रथा चालू आहे.
 पाच-सहा वर्षे झाल्यावर, पूर्वी करत असत त्याप्रमाणे बुरूडाच्या कांब्या, तट्ट्या यांचा वापर करून कायमस्वरूपी एक लाकडी गणपती बनवावा असे ठरले. मूर्तीची अंची केवढी असावी अशी चर्चा झाली, तेव्हा जमलेल्या मित्रमंडळीमध्ये जो सर्वात अंच होता, त्याने आपले दोन्ही हात अंचावले. तेव्हा त्या अंचीइतकी मूर्ती बनवायची योजना ठरली. त्याप्रमाणे तीन भागात मूर्ती करण्यात आली. पोटाचा भाग, हलकी पिंपे वापरून करण्यात आला. मांडी आणि पाय हा भाग लाकूड आणि कागद यांचा लगदा मिळून करण्यात आला. असं करता करता दोन पुरूषभर, म्हणजे जवळजवळ १३ फुटांची मूर्ती बनली.
 आणि त्यानंतर थाटामाटाचा, अत्सवी गणेशोत्सव सुरु झाला.

 दरवर्षी पहिले दिवशी सकाळी आणि शेवटच्या दिवशी रात्री श्री गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक निघे. सुरुवातीला बैलगाडीतून, तर नंतर ट्रकवर, मूर्ती चढवून मिरवणूक निघे. सकाळी ९ वाजता मिरवणूक सुरू होई, ती मारूती रोड, कापडपेठ,


सांगली आणि सांगलीकर.................................................................... ..७१