पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराज आले. त्यानी त्याला सांगितले "तू कीर्तनाची सिध्दता कर. मी अवश्य येईन.” आनंदित झालेला हुसेनबाळा नंतर सांगलीत आला. स्वप्नदृष्टांतामुळे त्याला धीर आला होता. तरीपण त्याने भीतभीत कोटणीस महाराजाना आपली मनातील अिच्छा सांगितली. तेव्हा तात्यासाहेब म्हणाले "मी तुला येतो म्हणून एकदा सांगितलय ना?” ते ऐकून हुसेनबाळा चाट पडला. मग दहा-बारा साथीदार घेऊन तात्यासाहेब डिग्रजला गेले. तेथील कीर्तनात इस्लामची मूळ तत्त्वे कशी अदात्त आहेत, ते त्यानी स्पष्ट करुन सांगितले. "कबीर कमालांच्या" दोह्यांची बरसात केली. (सर्वधर्मसमभावाच्या कल्पनेचा बेगडी अवतार अजून व्हावयाचा होता ! )
 असा हा 'आधुनिक एकनाथ' म्हणजे तात्यासाहेब कोटणीस, यांचे २७ जानेवारी १९२४ रोजी दुःखद निधन झाले. आयुष्यभर त्यानी देवापुढे अभे राहूनच कीर्तन केले. प्रकृती ढासळली तरी हा क्रम चुकला नाही. शेवटीशेवटी प्रकृतीची स्थिती गंभीर झाल्यावर, अनुयायांच्या तळमळीच्या आग्रहाखातर शेवटचे सहा महिनेच त्यानी व्यासपीठावर बसून कीर्तन केले. त्यानी आयुष्यभर जोडलेली पुण्याई एवढी जबरदस्त की त्यांची अध्यात्म-परंपरा त्यांच्या पुत्रपौत्रानी आज ७५ वर्षानंतरही अबाधितपणे चालू ठेवली आहे.
 जून १९०० मध्ये त्यानी कीर्तनास, अखंडित कीर्तनास, सांगलीत सुरुवात केली. त्या घटनेस आता, २१ व्या शतकात पदापर्ण केल्यावर, शंभर वर्षे पूर्ण झाली. सांगलीची कीर्तनप्रेमी मंडळी त्या कीर्तन-तपस्व्याच्या महानतेचा मोठ्या प्रमाणावर जाहीरपणे अद्घोष करतील यात काय शंका ?

●●●

सांगली आणि सांगलीकर...............................................................

६६