पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चुलत्यांचा म्हणजे बाबासाहेब मुजुमदारांचा आणि तात्यासाहेबांचा चांगला स्नेह होता याचा आधी अल्लेख आला आहेच. साधुदास त्यावेळी विद्यार्थीदशेत होते. त्यामुळे रात्री-बेरात्री अभ्यासाला अठत असत. तसे ते एकदा अभ्यासासाठी अठले. तात्यांना त्रास होऊ नये म्हणून रात्री अठून दिवा पेटवावा (त्यावेळी अिलेक्ट्रिसिटी नव्हती) आणि वाचत बसावे असा त्यांचा विचार होता. पाहतात तर तात्यासाहेब आपल्या अंथरुणावर मांडी घालून नामस्मरण करत बसलेले दिसले. ते मध्यरात्रीनंतर झोपतील म्हणून बघितले तरी तोच प्रकार! असे वेगवेगळ्या रात्री बघितले तरी तेच दृश्या ! हा प्रकार त्यांच्या लक्षात आला तेव्हा ते साधुदासाना (म्हणजेच गोपाळराव मुजुमदाराना) म्हणाले, "गोपाळ, मी जागा आहे म्हणून तू अभ्यास करायचं चुकवू नकोस.” साधुदासानी म्हटलय की तात्यासाहेबानी निद्रा संपूर्णपणे जिंकली होती. “साधकाची दशा अदास असावी” या तुकोबांच्या सांगीप्रमाणे त्यानी आपली वृत्ती अदास ठेवली होती. साधुदासानी म्हटलय की ही साधनसिद्धता केव्हा पुरी झाली, याची नक्की खातरजमा देता येत नसली, तरी एका अनुभवावरून त्यानी तर्क बांधला होता की १८८६ साली सद्गुरूंचा मंत्रानुग्रह मिळाल्यावर, सुमारे १६ वर्षांच्या खडतर साधनेनंतर ते सिद्धाच्या अवस्थेस पोचले असावेत. त्यासंबंधातील स्वत:चा आणखी एक अनुभव सांगताना साधुदासानी लिहिलय की १९०५च्या सुमारास तात्यासाहेबांच्या घरी शिकण्यासाठी म्हणून एक मुलगा राहात असे. थोडीशी साधना जमू लागल्यावर तात्यासाहेबानी आपल्याला मंत्रानुग्रह द्यावा म्हणून त्याची सारखी धडपड चालू होती. काही यश येईना म्हणून त्याने साधुदासांचा सल्ला घेतला. तेव्हा साधुदास म्हणाले " तू त्याना अजिबात त्रास देऊ नकोस. रोज पहाटे अठून त्यांचे घटकाभर मनोभावे चिंतन करीत जा. " असा प्रकार काही दिवस झाल्यावर तात्यासाहेब अचानक त्या विद्यार्थ्यापाशी आले, आणि म्हणाले "अहो ढवळीकर, माझे स्मरण करावे असा मी काही 'देव' नाही. गोपाळराव सांगणारे एक शहाणे आणि तुम्ही ऐकणारे सात शहाणे." ह्या प्रसंगावरून तात्यासाहेबाना सिद्धावस्था प्राप्त झाली होती असा साधुदासांचा कयास होता.

 आणखी एका प्रसंगाची हकीगत अधिकच बोलकी आहे. सांगलीजवळील डिग्रज. येथे हुसेनबाळा तांबोळी नावाचा सात्त्विक मुसलमान राहात असे. एकदा त्याने पूर्ण श्रद्धेने “रामविजय" ग्रंथाचे पारायण सुरू केले. ग्रंथसमाप्ती तात्यासाहेबांच्या हस्ते व्हावी आणि त्यांच्या कीर्तनाने सांगता व्हावी अशी त्याची अतीव अिच्छा होती. पण “आपण मुसलमान, मग कसचे कोटणीसमहाराज येतात?" असे विचार मनात येऊन तो खिन्न होत असे. अचानक एके रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात कोटणीस


सांगली आणि सांगलीकर.................................................................. .६५