पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या प्राणप्रिय चिमडला जाऊन का करू नये? म्हणून ते चिमडला मोठ्या कष्टाने प्रवास करत आले. मठाचे प्रवेशद्वारीच, साध्वी लक्ष्मीआक्का त्याना अतरवून घेण्यास आल्या होत्या. नगाऱ्यासारखे झालेले पोट, तटाटलेल्या शिरा-धमन्या, हातापायास . सूज येऊन सर्वांगावर पसरलेली पिवळसर छटा, अशी एकूण तात्यांची करुणास्पद स्थिती बनली होती. तेव्हा लक्ष्मीआक्कानी “भिऊ नको. साधुमहाराज तुला बरं करतील” असं म्हणून धीर दिला. त्या देतील तो तीर्थप्रसाद हाच रोगोपचार समजून ते एकेक दिवस ढकलत राहिले. एकवीस दिवस एकान्तवासात काढल्यावर संडासमार्गे दोन हात लांबीचा सर्प बाहेर पडला आणि व्याधिमुक्ती झाली. अदरव्याधीतील हा प्रकार म्हणजे सर्पोदर होता. महाराजांच्या कृपाप्रसादामुळे आणि लक्ष्मीअक्कांच्या शुश्रुषेनेच प्राणसंकट टळले, अशीच सर्वांची भावना झाली. चिमडच्या मठाबद्दल तात्यांच्या मनात एवढे ममत्व आणि श्रध्दा होती की पुढील आयुष्यात जे जे शक्य होते ते सर्व त्यानी चिमडच्या मठासाठी केले. सद्गुरू रामचंद्रमहाराजांवर त्यांची नितांत श्रद्दा होती. ते एकदा मुधोळला आले होते तेव्हा सर्व भक्तांसमक्ष तात्यानी आपला सगळा पगार गुरूमहाराजांपुढे दक्षिणा म्हणून ठेवला! त्यांच्या आर्थिक दुःस्थितीची महाराजांना जाणीव होती. म्हणून ते म्हणाले. "बाबा रे, सारा पगार दिल्यावर तुम्ही मंडळी काय खाणार?” मग महाराजांनी साधुबुवांचा प्रसाद म्हणून दोन रूपये तात्यांच्या हातावर ठेवले. आणि म्हणाले. " हा प्रसाद म्हणून जतन करून ठेव म्हणजे तुला काही कमी पडणार नाही.” पराकोटीची श्रध्दा कशी असते ते पाहा. ते दोन रूपये आजहि कोटणीस घराण्यात जपून ठेवलेले आहेत!
 श्रीगुरूंच्या आणि लक्ष्मीअक्कांच्या हाताच्या अमृतस्पर्शाने पावन झालेली प्रत्येक वस्तू तात्यांना परमपवित्र असे. अकदा वाहन वेळेवर न मिळाल्याने तात्या चिमडच्या मठात अवेळी पोचले. रात्रीची स्वयपांकघरातील सामसूम बघून आणि आपल्या एकूण भिडस्त स्वभावानुसार "भोजन झाले आहे" असे बळेच त्यानी सांगितले. एकूण ‘प्रकार' लक्षात आल्यामुळे लक्ष्मीअक्कानी झाकून ठेवलेली कोरभर भाकरी शोधून तात्याना दिली. प्रेमाने दिलेला तो भाकरीचा तुकडा अद्यापहि कोटणीसांच्या वास्तूत सुरक्षित आहे!

 अनुग्रह झाल्यावर गुरूमहाराज आणि तात्या मठाच्या अंगणात अभे होते. तेव्हा आपल्या जीर्ण झालेल्या सोप्याकडे बोट दाखवून महाराजानी अकस्मात विचारले " हणमंतराव, तू ही इमारत आम्हाला चांगली बांधून देशील काय?” तेव्हा तात्या म्हणाले, “महाराज, माझी विपन्नावस्था आपणास ठाऊक आहेच. तथापि आपली कृपा होईल तर नक्कीच ही अिमारत बांधून काढेन." त्यावर महाराज मंद हसले. पण


सांगली आणि सांगलीकर......................................................................... .५९