पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे बंधनकारक होते. तेव्हा २० रू. पगारावर त्यांची नोकरी सुरु झाली. लवकरच त्यांची हुशारी, निलोंभी वृत्ती आणि तरतरीतपणा पाहून, श्रीमंत व्यंकटराव घोरपडे यानी त्याना आपल्या खाजगीकडे घेतले. तथापि संस्थानी राजकारण म्हणजे हेवेदावे, मत्सर, एकमेकांचे पाय ओढणे या गोष्टींचा वाईट अनुभव तात्याना यायचा होता.
 आणि थोडीशी गमतीची गोष्ट म्हणजे ज्या सत्संगाचा सदोदित लाभ व्हावा म्हणून तात्या आयुष्यभर धडपडले, त्या सत्संगाची सुरवात होतानाच त्याना Tree झाला. किंवा थोडक्यात तशी त्यांची परीक्षाच झाली. झालं ते असं.
 मुधोळ संस्थानातील मॅजिस्ट्रेटच्या हुद्यावर असलेले श्री. बाबासाहेब मुजुमदार (तात्यासाहेबांचं रसाळ चरित्र लिहणाऱ्या साधुदास तथा गोपाळराव मुजुमदार यांचे चुलते) आपल्या पाच-सहा सहकाऱ्यांसमवेत मुधोळजवळ असलेल्या चिमड ठ जात आणि सोमवारी नोकरीवर हजर होत. मच्छिंद्रगोरक्षादी नवनाथापैकी श्रीरेवणनाथ हे ज्या गुरूपरंपरेचे आद्य पुरुष मानले जातात, अशा ज्ञानशाखेचे एक पीठ चिमड येथे होते. तेथे त्यावेळी श्रीमत् रामचंद्रमहाराज यरगट्टीकर मठाधिपती होते. तसेच तात्याना पुढील आयुष्यात ज्या अत्यंत आदरणीय आणि मार्गदर्शक ठरल्या, त्या लक्ष्मीअक्कामहाराज या महाराजांच्या गुरुभगिनी पण तेथेच होत्या. अध्यात्मिक मनोवृत्तीच्या तात्याना ही पर्वणीच होती. या महाराजांचा आपल्यालाही गुरूपदेश मिळावा, ही आस त्याना लागली. म्हणून ते बाबासाहेबांबरोबर चिमडला जाऊ लागले. अवघ्या २२ व्या वर्षीच त्याना गुरुपदेश मिळाला. अशी एका बाजूने त्यांची अध्यात्मिक प्रगती होत होती. त्याचवेळी मुधोळ दरबारात “आता हणमंतरावजी कोटणीस भलत्याच(?) मार्गाला लागलेत. कामाकडे त्यांचे लक्ष नाही. गुरुबाजीला बळी पडले आहेत. वगैरे वगैरे.” अशा तऱ्हेच्या कागाळ्यांमुळे त्याना नोकरीत अपमान आणि मन:स्ताप सोसावा लागला. मुन्सफ असलेले तात्या, शिरस्तेदार म्हणून खाली घसरले. त्याहून मानभंग म्हणजे तो चार्ज घेत असतानाच अमुक अका कारकुनास शिरस्तेदार पद देऊन, आपण स्वतः त्याचेकडील कारकून म्हणून काम करावे असा हुकुम झाला! अखेर नोकरी कायम सोडण्याचा मनोमन निश्चय करुन, तात्यांनी एक वर्षांच्या बिनपगारी रजेचा अर्ज पाठवून दिला.
 एका दृष्टीने ही अिष्टापत्ती ठरली. कारण ज्या वकिली व्यवसायाने त्याना आयुष्यात स्थैर्य दिले, अनेक गोष्टी मनासारख्या करायला मिळाल्या, त्या वकिलीच्या परीक्षेसाठी त्यानी कंबर कसली.

 मात्र दरम्यानचा काळ फार हलाखीचा होता. सर्व चुलते मंडळी वयस्क झालेली. धाकटी सख्खी चुलत भावंडे शिक्षणाची, घरात वीस-पंचवीस मंडळींचा


सांगली आणि सांगलीकर................................................................. ..५७