पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'आधुनिक ओकनाथ' पारमार्थिक कीर्तनकार
संत कोटणीस महाराज



 १८४३ साली कै. विष्णुदास भावे यानी 'सीतास्वयंवर' हे नाटक प्रथमतः रंगभूमीवर आणलं. त्यामुळे सांगली ही 'नाट्यपंढरी' म्हणून ख्यातकीर्त झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभानंतर काही वर्षातच, आणखी एका थोर सांगलीकरामुळे सांगली ‘कीर्तनपंढरी' म्हणूनही ओळखली जाऊ लागली.
 हा श्रेष्ठ सांगलीकर म्हणजे ज्या गुरूदेव रानडे यानी त्यांचे वर्णन 'आधुनिक एकनाथ' असे केले आहे, ते संतश्रेष्ठ श्री तात्यासाहेब कोटणीसमहाराज !
 वास्तविक प्रपंच आणि परमार्थ या दोहोंचे नाते छत्तीसच्या आकड्याप्रमाणे असते. प्रपंच करणारे अनेक असतात. परमार्थ करणारे तुलनेने थोडे असतात. पण प्रपंच साधून परमार्थ साधणारे महाभाग जवळजवळ नसतातच. जुन्या काळात जसे या दोहोची सांगड घालणारी एकच एक थोर व्यक्ती म्हणून, फक्त संत एकनाथमहाराजांकडेच बोट दाखवता येते, तसे आधुनिक काळात असे सर्वमान्य व्यक्तिमत्व, म्हणजे संतश्रेष्ठ श्री तात्यासाहेब कोटणीसमहाराज !

 तशी सांगली ही भाविकांची भूमीच आहे. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे जे मूळ पुरूष हरभट, त्यांची अनन्यसाधारण भक्ती पाहून श्रीगजाननाने सांगलीत कायमस्वरूपी निवास केला आहे, असं सर्वसामान्य भाविकाला वाटतं. श्री रामानंदमहाराज खटावकर, , त्यांचे परात्पर गुरु श्री सदाशिवमहाराज, बाबासाहेब मुजुमदार, सत्यव्रततीर्थ मौनीबाबा, श्री आनंदमूर्ती, कृष्णा परीट, अप्पाराव पोवार, अण्णाबुवा, धोंडिराममहाराज, श्रीनारायणमहाराज मळणगावकर, अवधूत संप्रदायी श्री ताम्हनकर महाराज ही सारी सांगली परिसरातील संतमंडळी. या सर्वानी जी भक्तिमंदिराची वास्तू अभी केली, तिला कळसावर नेले ते तात्यासाहेबानी. सतत दोन तपे म्हणजे २४ वर्षे अखंड कीर्तन करणे हाच एक चमत्कार आहे. महिनाभर कीर्तन करायचं म्हटलं की किती त्रास होतो ते त्या कीर्तनकारालाच ठाऊक. तेव्हा अशी कीर्तने अखंडपणे, तेहि ठराविक वेळी, प्रकृतीची तमा न बाळगता करणे, ही किती अवघड गोष्ट! पण अशी ही साधना वर्षानुवर्षे, श्रीएकनाथांप्रमाणे स्वतःच प्रसादाचा, तेलबत्तीचा खर्च करून


सांगली आणि सांगलीकर................................................................... .५५