पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगलीच गाजवली.
 याच सुमारास देवलांच्या रुपांतर प्रतिभेला ललकावणारी संधी आली.
 १८९०-९१ च्या वर्षात इंदूरच्या संस्कृतप्रेमी अधिपतीनी बाणभट्टाच्या 'कादंबरी' वरून मराठीत संगीत नाटक लिहिण्याची स्पर्धा जाहीर केली होती . बाणभट्टाच्या लांबलचक समासांची ज्याना ओळख आहे, त्याना हे काम किती कटकटीचे, नाट्यकौशल्याची कसोटी पाहणारे होते याची कल्पना येईल. बक्षिसाची रक्कम एक हजार रूपयाची होती, हे मुख्य आकर्षण असले तरी त्यातील आव्हानाचे आकर्षणच देवलाना अधिक लोभावून गेलेले असणार! या कादंबरीवरून 'शापसंभ्रम' हे नाटक देवलानी लिहिले. अपमा-अत्प्रेक्षानी खचाखच भरलेल्या प्रदीर्घ वर्णनातून आणि काव्यमय कथेतून देवलानी अप्रतिम अशा नाटकाची निर्मिती केली. देवलांची बाकीची नाटके मूळ नाटकांवरून रूपांतरित झाली असल्याने त्यांच्या प्रतिभेला फारसा वाव नव्हता. पण जिथे कथेवरून नाटकाची निर्मिती असल्याने, नाटकाची पदे, प्रवेश, पात्रांची भाषणे, याबाबतीत देवलाना मुक्त स्वातंत्र्य मिळाले आणि त्यामुळे निर्माण झालेले नाटक परीक्षकांच्या कसोटीला अतरलेच पण रंगभूमीवरील यशस्वितेच्या कसोटीलाहि पुरेपूर अतरले. 'शापसंभ्रम' ला अर्थात्च पहिले बक्षिस मिळाले. यात आणखी एक गंमत अशी होती. नाटकाचे हस्तलिखित पाठवताना लेखकाने आपले नाव प्रकट करावयाचे नव्हते तर खुणेचे वाक्य पाठवायचे होते. देवलानी खुणेचे वाक्य म्हणून पाठवलेली आर्या तितकीच प्रभावी आहे. ती आर्या अशी:

'असती चतुर परीक्षक, राय रसिक, जा सभेत जय मिळवी
वळवी गुणे गुणज्ञा, गुरूजनकाचीहि योग्यता कळवी. "

 इंदूरच्या अधिपतीनी मुद्दाम देवलाना बोलावून घेतले.ते स्वतः संस्कृतचे जाणकार असल्याने त्याना 'शापसंभ्रम' नाटकाचे फार अप्रूप वाटले. त्यानी देवाना पारितोषिक तर दिलेच; याखेरीज अस्मानी रंगाचा रेशमी झगा, घड्याळ, चांदीच्या मुठीची काठी व पगडी देऊन देवलाना गौरविण्यात आले.
 ‘शापसंभ्रम' नाटकाचा प्रयोग सुरूवातीला आठ आठ तासांचा व्हायचा! आधी सात अंकांचा, मग पाच अंकांचा होत असे. १८९३ पासून असा प्रकार होत होता. अखेर देवलानी १९०८ साली बरीचशी पदे गाळून, नवीनच रंगावृत्ति तयार केली. नेहमी स्त्रीभूमिका करणारे भाऊराव कोल्हटकर या नाटकात पुरूष - भूमिकेत वावरले. पुंडरिकाची त्यांची भूमिका चांगली गाजली. याशिवाय चिंतोबा गुरव, कृष्णराव गोरे आदी नटांच्या भूमिकानी हे नाटक गाजले.

 १८९३ च्या सुमारासच देवलानी अका परकीय नाटकाच्या आधारे 'फाल्गुनराव


सांगली आणि सांगलीकर............................................................... ३७