पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

“इतके होता जाते माध्यान्ह अलटून किती दुःख सोसू किती रडू यमुताई ।
नाही झोप, पडते तशीच जाऊन कर्म पाठिशी लागलं खरं बाई
घरिं तरं सदा दुखण्यानं हैराण देवा गोविंदा झडकरि येईबा धावून
मात्रा घाशिता झिजले हात सहाण धेनू वरती काढावी पंकातून ||"

 “धेनु वरती काढावी पंकातून " या शेवटच्या ओळीवरून ती दुःखी सासुरवाशीण अद्धाराची अपेक्षा करते असे दाखवले आहे.
 'शारदा' नाटकाचे बीज बालवयातच त्यांच्या अंतर्मनात केव्हातरी रुजले असावे !
 देवलाना गरीबीचे चटके फार लहानपणापासूनच बसलेले असावेत. त्यामुळेच त्यांचे शिक्षण खंडित होत होत वयाच्या २३-२४ व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. याच गरीबीच्या चटक्यामुळे अत्तर आयुष्यात देवल आपल्या नाटकांचे अधिकार, मानधन अशा विषयात कठोरपणे वागत.
 मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजशिक्षण परवडण्यासारखे नव्हते. म्हणून चरितार्थाची सोय होईल या हेतूने कदाचित त्यानी शेतकी शिक्षणाचा अभ्यासक्रम पुरा केला असावा. त्यानी पुण्याच्या 'पूना कॉलेज ऑफ सायन्स' मधून दोन वर्षाचा अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्यानी थोडा काळ सरदार हायस्कूल बेळगाव, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे नोकऱ्या केल्या असे दिसते. पण वरिष्ठांशी न पटल्याने सोडल्या. बेळगावच्या शेती खात्यातील नोकरी तर त्यानी निव्वळ नाटकाच्या प्रेमापोटी सोडली असे सांगतात. ते बेळगावला नोकरी करत असताना त्यांच्या मित्रमंडळीनी एका नाटकाचा प्रयोग पुण्यात शनिवारी लावला. त्याचे पत्र देवलाना दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी मिळाले. त्या नाटकात देवलांची महत्त्वाची भूमिका होती. हूगवर्फ या त्यांच्या वरिष्ठ साहेबाला हा माणूस नाटकासाठी रजा मागतो या गोष्टीचा फार राग आला. त्याने रजा नाकारली. नाट्यवेड्या देवलाना हे कसं सहन होणार ? त्यानी साहेबांच्या तोंडावर राजिनामा फेकला आणि ताबडतोब टांगा पुण्याच्या दिशेने हाकारला! या दंतकथेत सत्याचा अंश किती हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे ते देवलांचे नाट्यप्रेम. आपल्या या वेडापोटी आणि तापट स्वभावापोटी नोकरीत आपले एकूण जमणे कठीण, ही खूणगाठ त्यानी मनाशी बांधली आणि यापुढे आयुष्यात नोकरी करायची नाही हे पक्के ठरविले. अर्थात हा निश्चय आयुष्यभर पाळला.

 पुण्यातील वास्तव्याच्या सुरूवातीच्या काळात त्यानी आपले एक मित्र श्रीनिवास भिकाजी देसाई यांच्या साहाय्याने 'कादंबरी - कलाप' या नावाचे मासिक सुरू केले. त्यात रेनॉल्डसच्या 'मिस्टरीज ऑफ लंडन' या कादंबरीचे भाषांतर छापण्यास


सांगली आणि सांगलीकर...................................................................... .३३