पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणीव आपल्याला भयभीत तर करत नाहीच, उलट राज्याच्या (म्हणजे संस्थानच्या) अंतिम हितासाठी ही गोष्ट अत्यावश्यक आहे हे सांगताना त्यानी म्हटलंय,
"It will be now for you, people of Sangli state, to rise to the stature of citizenship demanded by the democratic form of Government.... ..........I am thankful to the Providence for enabling me to realize the dream of my life, in the opportunity vouchsafed to me to crown the constitutional reforms by the grant of responsible Govt. " पूर्ण लोकनियुक्त राज्यपध्दतीचे अधिकार जनतेला प्रदान केल्यानंतर इंग्लंडच्या राजाप्रमाणे राजेसाहेबानी 'घटनात्मक राजाची'(Constitutional Head) भूमिका शब्दाच्या खऱ्या अर्थाने बजावली. लोकशाही प्रक्रिया, आपल्या छोट्या राज्यापुरती का होईना, पण यशस्वीपणे राबवली.
 अशा या सुसंस्कृत राजाचा शिक्षणविषयक दृष्टिकोन प्रागतिक असणार हे सांगायला नकोच. प्राचीन वेदविद्येपासून तो अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण आपल्या संस्थानात असावे ही त्यांची धारणा होती. सांगलीच्या वेदशाळेत व शास्त्रशाळेत ऋग्वेद, यजुर्वेद, न्याय, व्याकरण, ज्योतिष अशा विविध प्रकारच्या शाखांच्या शिक्षणाची सोय होती. सर्व विद्यार्थ्याना दोन वेळचे भोजन व विनामूल्य वास्तव्य अशा सोयी देऊन शिक्षणाची व्यवस्था केली जात असे. सुप्रसिद्ध विद्वान पंडित आणि लेखक पं. महादेवशास्त्री जोशीनी या कामी राजेसाहेबानी दाखवलेल्या औदार्याचा फार आवर्जून अल्लेख केला आहे. संस्थान खालसा झाल्यावर हळूहळू हे वेदविद्येचे व्यासपीठ काळाच्या ओघात नाहीसे झाले ही फार दुर्दैवी आणि चुटपूट लावणारी बाब आहे. सांगली संस्थानात प्राथमिक शिक्षण तर मोफत होतेच पण सक्तीचेही होते. सांगलीतील सुप्रसिध्द, विलिंग्डन आणि वालचंद इंजिनियरींग कॉलेजच्या अभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शहापूरसारख्या दूरच्या ठिकाणीसुध्दा १९२० सालीच हायस्कूल सुरू झाले. शैक्षणिक व सामाजिक कार्यात राजेसाहेबांसह, फार मोठा सहभाग राणीसाहेब सौ. सरस्वतीदेवी यांचा होता. प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाची सोय, निव्वळ मुलींसाठी हायस्कूल अशा विविध सोयी करण्यात त्यांचा सहभाग होता. राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा, पुण्याची हुजूरपागा, सेवासदन, फर्ग्युसन कॉलेज अशा अनेक संस्थांना राजेसाहेबानी भरघोस देणग्या दिल्या. सांगलीत इतर संस्थानांसारखे भव्य वाडे, अत्तुंग प्रासाद नाहीत, पण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनियरींग कॉलेजे म्हणजे राजेसाहेबांची केवढी हृद्य स्मारके आहेत.

 राजेसाहेबानी ३७-३८ वर्षे राज्य केले पण रूढ अर्थाने राजेपण भोगले नाही. त्यांच्या जीवनात विलासी जीवनाचा, आत्यंतिक भोगवादाचा मागमूसही आढळत


सांगली आणि सांगलीकर................................................................. .१८