पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्षेत्रात भरघोस प्रगती झाली ही अत्यंत अभिमानास्पद बाब खरीच पण सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास झपाट्याने होऊ लागला ही मोठी चिंतादायक गोष्ट आहे. जुन्या काळात, सांगलीची हवा आणि सांगलीचं पाणी यांची कीर्ती अितकी होती. की बाहेरगांवचे अनेक लोक या शांत आणि रम्य नगरीत मुद्दाम घरे बांधून रहायला येत. आता शहराची झालेली बेसुमार वाढ, नियम धाब्यावर बसवून झालेली अनधिकृत बांधकामे, खाचखळग्यांचे रस्ते, सांडण्याची दुरवस्था यामुळे हवा प्रदूषित श शेरीनाल्यामुळे पाणी खराब झालं आगि औद्योगिक अशांतता, बेकारी, काळाबाजारवाले, मटका, दारु, एकतर्फी प्रेमापोटी झालेल्या निर्घृण हत्या, अशा अनेक कारणांनी, सरोवरासारख्या शांत असलेल्या सांगलीची विलोभनीय शांतता धोक्यात आली! दिवसाढवळ्या झालेले खून, दरवडे, बलात्कार, मारामाऱ्या, यांमुळे "मुंबई आली रे अंगणी" अशी सांगलीची अवस्था झाली आहे. “ स्वच्छ सांगली, सुंदर सांगली" असे घोषणांचे कितीहि ढोल वाजवले गेले तरी प्रत्येकाच्या 'मनात' आधी 'सुंदर सांगली' अवतरली पाहिजे. तर प्रत्यक्षात अवतरणार!

 "कृष्णाकाठी सांगली, नाही अुरली चांगली" असं म्हणायची दुर्दैवी वेळ यायला नको असेल, तर प्रत्येक अभिमानी सांगलीकरानेच कंबर कसायला हवी.

 सांगलीचं नाव अुज्ज्वल करणाऱ्या भूतकाळातील थोर सांगलीकरांना तीच खरी आदरांजली ठरेल!

 (शेवटी एक परिशिष्ट जोडून त्यामध्ये सांगलीतील काही अग्रगण्य संस्था आणि नामवंत सांगलीकर यांचेविषयीची माहिती देण्यात आली आहे.)


सांगली आणि सांगलीकर..............................................................१०