पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रिसर्च फौंडेशन या नावाने हे संशोधन चालते. येथील अनेक प्राध्यापकांनी सादर केलेले संशोधनपर शोध निबंध मान्यता पावले आहेत. 'व्हिजन' या नावाने एक मोठे वैज्ञानिक व औद्योगिक प्रदर्शन या कॉलेजमार्फत भरविले जाते. कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या कॉलेजचे अनेक नामवंत विद्यार्थी इस्रो, नासा सारख्या विश्वविख्यात केंद्रांमध्ये व विविध औद्योगिक संस्थांमध्ये आपल्या बुद्धिची चमक दाखवत आहेत. १४) स्वा. सावरकर प्रतिष्ठान : ज्येष्ठ समाजसेवक कै. बापूराव साठे यांनी स्थापन केलेली आणि वा. द. नामजोशीसरांनी अल्पावधीत नावारुपाला आणलेली ही संस्था १९७३ साली स्थापन झाली. समाजातील बुद्धिवान विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन करुन या संस्थेने पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञा शोध ( N. T.S.) ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. संस्थेची ही कामगिरी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या तोडीची आहे हे नि:संशय. स्वा. सावरकर प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थी वसतिगृह, विकास वाचनालय, हुतात्मा मदनलाल धिंग्रा व्यायाम शाळा आदी विभाग आहेत. या संस्थेची प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला ही सांगलीतील नामवंत शाळा असून दरवर्षी शालांत प्रमाणपत्र परिक्षेत या शाळेचा निकाल ९० टक्क्याहून अधिक असून त्यांचे दरवर्षी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीत असतात. स्वा. सावरकरांचा सैनिकीकरणाचा संदेश या संस्थेने राबवून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N.D.A.) मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमाला सिनेअभिनेते चंद्रकांत गोखले व सोलापूर येथील विधिज्ञ श्री. नानासाहेब वळसंगकर यांनी बहुमोल आर्थिक सहाय्य केले आहे. १५) भारती विद्यापीठ : आधुनिक काळात सांगलीच्या वैभवात भर टाकणाऱ्या ज्या काही भव्य अमारती अभ्या राहिल्या त्यातील भारती विद्यापीठ विभागीय कार्यालय, सांगली या संस्थेची सात मजली इमारत सर्वांचे लक्ष एकदम वेधून घेते. वास्तु-शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून संस्थेची ही इमारत प्रेक्षणीय आहे. पण नुसतंच प्रेक्षणीय असणे एवढेच या वास्तूचे वैशिष्ट्य नाही तर त्या वास्तूत चालणारे अपक्रमही तितकेच महत्वाचे आहेत. मा. नामदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यापीठाने भारतात अनेक ठिकाणी सांगली जिल्ह्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. परंतु सांगली जिल्ह्यात स्थापन झालेल्या भारतीय विद्यापीठाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरवात १९८३ साली झाली. तेंव्हा सांगलीच्या मध्यवर्ती भागात असलेली ही चावडीची जागा भारती विद्यापीठाने कै. वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने मिळवली. वास्तूचे बांधकाम १९८९ मध्ये पूर्ण झाले. त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन, सांगली आणि सांगलीकर.. . २५३