पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२) विलिंग्डन कॉलेज : २२ जून हा भौगोलिक दृष्ट्या मोठा दिवस असेल पण सांगलीकरांच्या दृष्टीने खराच मोठा दिवस आहे. कारण त्यादिवशी सांगली गावातीतल पहिल्या कॉलेजचा जन्म झाला. ८० वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रात अच्चशिक्षणाची सोय, पुणे सोडल्यास कुठेच नव्हती. कोल्हापूरचे राजाराम कॉलेज काही कारणाने बंद होते. अशा काळात २२ जून १९१९ रोजी विलिंग्डन कॉलेजची स्थापना झाली. नेहमीप्रमाणे सांगलीच्या राजेसाहेबांचा या कार्यात मोठा पुढाकार होता. कॉलेजचे वर्ग सांगली गावातच त्यानी अपलब्ध करुन दिलेल्या जागेत भरत. १९२४ मध्ये सध्याच्या ठिकाणी १२५ एकराच्या जागेवर कॉलेजची इमारत अभी राहिली. सुरवातीला पूर्णपणे ओसाड असणाऱ्या या भागात हिरवळ अगवली ती या कॉलेजमुळे. पहिले प्रिन्सिपॉल कै. गोविंद चिमणाजी भाटे यानी या कामासाठी अपार कष्ट अपसले. सांगली गावाला शैक्षणिक अंची प्राप्त करुन देण्यात या कॉलेजचा मोठा वाटा आहे.. सुरवातीच्या काही वर्षात कॉलेजला नावारुपाला आणण्यात प.म. लिमये, द.गो. कर्वे, वि.कृ.गोकाक, के. गो. पंडित यांसारख्या प्राचार्यांचा मोठाच सहभाग होता. अपराष्ट्रपती बी.डी. जत्ती, न्यायमूर्ती व्ही. ए. नाईक, पद्मभूषण डॉ. आर. एन. दांडेकर, डॉ. सरोजिनी महिषी, वि. स. पागे, पु. ल. देशपांडे, वसंतराव कानेटकर, डॉ. वि. रा. करंदीकर असे नामवंत याच कॉलेजात त्यांच्या विद्यार्थीदशेत शिक्षणासाठी होते. आज या कॉलेजात २२००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सांगलीची शैक्षणिक जडणघडण करण्यात या विलिंग्डन कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे. १३ ) वालचंद कॉलेज : सांगली-मिरज रस्त्यावर १०० एकरांच्या विस्तृत जागेत १९४७ साली वालचंद कॉलेजची स्थापना झाली. दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्वात जुने तंत्रविद्यालय आहे. श्री. धोंडुमामा साठे यांच्या अथक प्रयत्नांनी या कॉलेजची उभारणी झाली. सुरुवातीला या कॉलेजचे नांव न्यू इंजिनिअरींग कॉलेज असे होते.. १९५५ साली हे कॉलेज आर्थिक अडचणीत सापडले तेंव्हा शेठ वालचंद हिराचंद मेमोरिअल ट्रस्टने कॉलेजला मोलाची आर्थिक मदत केली. तेव्हापासून वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग असे नामकरण झाले. राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची कॉलेजला मदत आहेच. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरींगसाठी सुसज्ज प्रयोगशाळा असलेल्या या कॉलेजात डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरींग कोर्सेसचे शिक्षण दिले जाते. या कॉलेजचे ग्रंथालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये ३६ हजार पुस्तके आहेत आणि १० हजारांवर तंत्रविषयक मासिके आहेत. या कॉलेजची मालमत्ता वास्तु, प्रयोगशाळा आणि इतर इमारतींसह ९ कोटी रुपयांच्या घरात जाईल इतकी मोठी आहे. या कॉलेजमध्ये संशोधनात्मक अनेक प्रकल्प राबविले जातात. शेठ गुलाबचंद सांगली आणि सांगलीकर.. • २५२