पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यू लॉ कॉलेज, भारती बँक या संस्थांचे कामकाज चालते. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये एम्बीए, एम्सीए, एम्सीएम् डीबीएम् डीसीएम्, असे पदव्युत्तर कोर्सेसचे शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे या वास्तूमध्ये भारती विद्यापीठाचे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे विभागीय कार्यालय आणि डॉ. पतंगराव कदम जनसंपर्क कार्यालयही आहे. पण सर्वसामान्य जनतेला ही वास्तू माहित असते ती तिथे असलेल्या भारती बझारमुळे. सर्व जीवनोपयोगी वस्तूंचे मोठे भांडारच तेथे असल्याने दिवसभर तेथे ग्राहकांची वर्दळ असते. भारती विद्यापीठाचे १५ वर्षापूर्वी स्थापन झालेले डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय आता सांगलीवाडी येथे स्वतःच्या भव्य इमारतीमध्ये सुरु आहे. तेथे कला, विज्ञान, आणि वाणिज्य अशा तिन्ही शाखांचे शिक्षण दिले जाते. डॉ. पतंगराव कदम यानी शैक्षणिक संस्थांचा जो सुनियोजित असा प्रचंड पसारा महाराष्ट्रात अभा केला आहे त्याची थोडीशी कल्पना हे कॉलेज बघिल्यावर निश्चितच येते. या कॉलेजचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. म. शि. सगरे हे येथे अनेक प्रकारचे शैक्षणिक क्षेत्रातील चांगले प्रकल्प राबवित असतात. १६ ) देवल स्मारक मंदिर : सांगली ही नाट्यपंढरी म्हणून गौरवली गेली असल्याने सांगलीत अनेक नाट्यसंस्था असणे स्वाभाविकच आहे. त्या सर्व संस्थांमधील 'देवल स्मारक मंदिर' ही सर्वात जुनी संस्था असावी. नाट्याचार्य देवलांच्या स्मृतिप्रित्यर्थ सांगलीतील नाट्यप्रेमी मंडळीनी १ जानेवारी १९२७ रोजी 'देवल क्लब' या नावाने एक संस्था स्थापन केली. याच संस्थेचे पुढे 'देवल स्मारक' असे नामकरण झाले. आता अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटके. वैभवशाली संगीत नाट्यपरंपरा हा मराठी रंगभूमीचा आत्मा. पण तीच गौरवशाली परंपरा आजकाल नष्टप्राय होऊ लागली आहे. या संस्थेने, गेल्या ७-८ वर्षांमध्ये ही परंपरा जपण्याच्या दृष्टीने स्पृहणीय कामगिरी बजावली आहे. संस्थेने 'शारदा', ‘स्वयंवर', 'मत्स्यगंधा', 'कट्यार काळजात घुसली', 'मंदारमाला' 'स्वरसम्राज्ञी', ‘संशयकल्लोळ’, ही संगीतप्रधान नाटके रसिकांसमोर सादर केली. १९९४ पासून बृहन महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धा, दिल्ली, महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा, आंतरराज्य संगीत नाट्य-प्रवेश स्पर्धा, अशा विविध स्पर्धांमधून अक्षरशः पारितोषिकांचा पाऊस पाडला. १९९७ मध्ये सादर केलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाला, दिल्लीच्या बृहन् महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक तर मिळालेच: खेरीज १६ वैयक्तिक पारितोषिके संस्थेने मिळविली. या संस्थेला आजवर, बलवंत पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र केसरी पुरस्कार, सानंद न्यास, इंदूर, कर्नाटक संघ, मुंबई असे विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. सांगली आणि सांगलीकर. . २५४