पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असा पहिलाच कारखाना आहे. या कारखान्यातून अनेक अत्पादने तयार होतात. शुभ्र दाणेदार साखर हे तर सर्वात महत्वाचे अत्पादन. त्याचबरोबर अॅसिटाल्डिहाईड अॅसेटिक ॲसिड, अॅसेटिक अनहैड्राईड ही रसायने, सर्व प्रकारची अल्कोहोल्स, देशी व विदेशी मद्ये या कारखान्यात बनविली जातात. पशुपक्ष्यांसाठी समतोल आहार-खुराकाबरोबरच, वनीकरणासाठी, नर्सरीमधून, दरवर्षी सातत्याने विविध फळझाडे व इतर नगदी अत्पन्न देणाऱ्या १० लाख रोपांची निर्मिती या कारखान्यात होते. या कारखान्यामार्फत डॉ. वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, सांगली हे इंजिनिअरींग कॉलेज व पॉलिटेक्नीकही १९८३ पासून चालवले जाते. सहकारी क्षेत्रात साखर आणि उप-पदार्थांचे अत्पादन करणारा, आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना अशी या कारखान्याची प्रसिद्धी आहे. ९) तरुण भारत व्यायाम मंडळ : सांगलीमधील जुन्या जमान्यातील वैशिट्यपूर्ण व्यक्तिमत्वाचे क्रीडाशिक्षक, कै. नाना देवधर यानी, मराठी शाळा नं.१ च्या क्रीडांगणावर, १९३० मध्ये, गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर, 'तरुण भारत व्यायाम मंडळ' या संस्थेची २० सभासदांसह स्थापना केली. या सर्वांच्या अविश्रांत श्रमामुळेच, संस्थेचा पाया भक्कम झाला. सर्वसामान्य जनतेत, व्यायामाची, खेळाची आवड निर्माण करणे आणि त्यायोगे निरोगी, चारित्र्यवान नागरीक तयार करणे हा मंडळाचा प्रमुख अद्देश आहे. या मंडळाच्या स्थापनेपूर्वी, सांगलीत व्यायाम संस्था नव्हत्या असे नाही. पण त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. आखाड्याच्या मर्यादित क्षेत्राचे रुपांतर, क्रीडांगणावरील विविध मैदानी आणि मर्दानी खेळांच्या व्यापक क्षेत्रांमध्ये करण्याचे श्रेय निश्चितपणे या संस्थेकडे जाते. सुरुवातीला लेजीम कवायती आणि सांघिक कसरती इतक्याच मर्यादेत काम करता करता, मंडळाने, हुतुतू, आट्यापाट्या, लंगडी, खो-खो, इत्यादि भारतीय सांघिक खेळांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष पुरविले. परिणामतः सांगलीत, मल्लांच्या पाठोपाठ, राष्ट्रीय खेळांमध्ये तरबेज असणाऱ्या खेळाडूंची पिढी नव्यानेच निर्माण होऊ लागली. मंडळाच्या स्थापनेच्या दोनच वर्षानंतर मंडळाचे खेळाडू गावोगावच्या क्रीडास्पर्धांमधून भाग घेऊ लागले. मंडळाच्या खेळाडूनी त्या स्पर्धांमधून अनेक वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिके मिळवली. विशेषत: हुतुतू हा खेळ किती अप्रतिम कौशल्याने खेळला जातो याचा एक वस्तुपाठच मंडळाच्या खेळाडूनी घालून दाखवला. नुसत्या क्रीडास्पर्धेतून भाग घेण्यात मंडळाने धन्यता मानली नाही तर १९४६ पासून, भव्य प्रमाणात राष्ट्रीय खेळांच्या सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. १९८१ च्या जानेवारीत तर २९ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान या संस्थेला मिळाला. हा एक प्रकारचा बहुमानच होता. कारण अशा स्वरुपाच्या राष्ट्रीय स्पर्धा त्या त्या राज्यांच्या राजधानीतच भरतात. पण तरुण भारत व्यायाम सांगली आणि सांगलीकर. . २४९