पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चहाबरोबरच किराणा माल व तेलाचा घाऊक व्यापार या पेढीद्वारे केला जातो. आसामच्या सीटीसी चहाची चव प्रथम सांगलीकरांपर्यंत पोहोचविण्याचे काम या पेढीने केले असून 'जी. एस. चहा' या नांवाने त्यांचा चहा प्रसिद्ध आहे. गोविंदराम शोभाराम कंपनीचे अध्वर्यू पुरुषोत्तमभाईंचे ज्येष्ठ पुत्र कै. कांतीभाई हे नुकतेच निवर्तले. कांतीभाई शहा हे १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभागी होते. कै. वसंतदादा आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सुरक्षितपणे भूमिगत ठेवण्यात त्यांचा सहभागी होता. कांतीभाई राष्ट्रसेवादलाचेहि सक्रीय कार्यकर्ते होते. साने गुरुजी आणि एस.एम. जोशी यांच्यासारख्या तळमळीच्या समाजवादी नेत्यांचे ते अनुयायी होते. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाचे कोणतेही प्रमाणपत्र अथवा मानधन स्वीकारले नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही कांतीभाईंनी सांगलीच्या सामाजिक कायापालटामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. सांगलीमध्ये रोटरी क्लबसारखी सेवाभावी संस्था उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कामाची सांगलीमधील सुरूवात, गुजराथी सेवा समाज, ही कांतीभाईच्या मोलाच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने सुरु झालेली कांही वानगीदाखल उदाहरणे आहेत. श्रीसिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये तर कांतीभाईचा सिंहाचा वाटा होता. पण ते पूर्ण झालेले पाहण्याचा योग मात्र त्याना आला नाही. व्यावसायिक सचोटी व प्रामाणिकपणा यांचा आदर्शच आपल्या कामगिरीने गोविंदराम शोभाराम आणि कंपनीने समाजाला घालून दिला आहे. ८) वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. : सांगलीसारख्या ठिकाणी साखर कारखान्याची अभारणी ही चाळीस वर्षापूर्वी एक प्रकारची क्रांतीच होती. १९४८-४९ मध्ये प्रवरानगरला महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरु झाला तेव्हा वसंतदादाना चैन पडेना. या भागात साखर कारखान्याची कल्पना व्यवहार्य मानली जात नव्हती कारण सांगली भाग तसा कोरडवाहू शेतीचा. पण साखरं कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्याना चांगली बरकत येईल याची वसंतदादाना खात्री होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून, ५-६ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यानी साखर कारखान्याची अभारणी केली (सांगली-माधवनगर रस्त्यावरील ९० एकर जागेवर) आणि १९५८ साली पहिला गळीत हंगाम सुरू करून दाखविला. या कारखान्याच्या क्षेत्रात ८५ अपसा जलसिंचन योजना यशस्वीपणे चालविल्या जातात. त्यामुळे ७२,१५७ एकर जमीन ओलिताखाली येते. दररोज पाच हजार मे. टन अस गाळशक्तिचा तसेच क्षारपड / चिबड जमिन सुधारणा प्रकल्प राबवणारा सांगली आणि सांगलीकर.. २४८