पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंडळाचे, या क्षेत्रातील अनुभव आणि कर्तृत्व पाहून ही संधी मंडळाने आपल्याकडे खेचून आणली म्हणायला हरकत नाही. याचवेळी भारत-पाकिस्तान कबड्डी - कसोटी सामनाही सांगलीत खेळला गेला. यानंतरच्या कालावधीत मंडळाची खूप भरभराट होत गेली. वसंतदादांच्या हस्ते १९८५ मध्ये पायाभरणी होऊन भव्य स्टेडियम बांधले गेले. १९९२ पर्यंत बांधकाम चालू होते. सरकारी अनुदान आणि लोकांच्या देणग्यांच्या आधारावर प्रचंड काम झाले. आज मंडळाकडे १०८ X ७४ मीटरचे भव्य क्रीडागंण आहे. चारी बाजूनी बंदीस्त असलेल्या या क्रीडांगणावरील खेळ, तिन्ही बाजूंच्या गॅलऱ्यांमधून २५-३० हजार प्रेक्षक पाहू शकतात. आता हे क्रीडांगण सुसज्ज आहे. व्हॉलीबॉल, रिंगटेनिस खेळण्याची सोय आहे. बॅडमिंटनसाठी प्रशस्त हॉल आहे. योगासने स्वतंत्रपणे शिकविण्याची सोय आहे. अत्तम मार्गदर्शन करणारे कोच आहेत. १९८७ पासून संस्थेने एका वेगळ्याच क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेने 'तरुण भारत बझार' या भव्य डिपार्टमेंटल स्टोअरची स्थापना केली आहे. क्रीडाक्षेत्रातील एका संस्थेने हे काम अंगावर घ्यावे हे थोडे मौजेचे वाटते. पण याला कारणीभूत झाली ती १९७२ या दुष्काळातील संस्थेच्या कार्यकर्त्यांची निरलस आणि चोख सेवा. १९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तेंव्हा संस्थेच्या कार्यकर्त्यानी धान्यवाटपाचे काम स्वयंसेवी वृत्तीने केले. ते पाहून अशा तऱ्हेचे कायमस्वरुपी काम संस्थेने अंगावर घ्यावे अशी लोकांकडून मागणी होऊ लागली. आणि त्याच विचारमंथनातून 'तरुण भारत को - ऑप .सेंट्रल कंझ्युमर्स स्टोअर्स' ही संस्था सुरु झाली. सरकारी अनुदान आणि समाजातील उत्स्फुर्त देणग्या यांच्या माध्यमातून भाग भांडवल जमा झाले. ही योजना अपेक्षेपेक्षा फारच यशस्वी झाली. १०) सांगली हायस्कूल, सांगली : भूतपूर्व सांगली संस्थानचे अधिपती शिक्षणप्रेमी होते. त्यामुळेच १८८४ साली सांगलीत 'सांगली हायस्कूल, या सांगलीतील सर्वात जुन्या हायस्कूलची स्थापना झाली. जवळजवळ ११६ वर्षापूर्वी म्हणजे १८८४ ते १९१४ पर्यंत सांगलीतील अनेक कर्तबगार व्यक्तिंची जडण-घडण करण्यात ही एकच एक संस्था कारणीभूत होती. १९१४ साली सिटी हायस्कूल या खासगी हायस्कूलची स्थापना होईपर्यंत, सांगली हायस्कूल हे त्याकाळातील एकमेव हायस्कूल होते. नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर, साधुदास, वि.स. खांडेकर यासारख्या मातब्बर व्यक्तिंची जडणघडण याच शाळेत झाली. श्रीपादशास्त्री देवधर, पाटीलशास्त्री यांच्यासारख्या संस्कृत शिक्षकांमुळे जशी शंकरशेट शिष्यवृत्तीची गौरवशाली परंपरा या शाळेला लाभली तशीच हणमंतराव भोसले या क्रीडाशिक्षकामुळे विजय हजारे, नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. ड्रॉईंग, गायन, तालिम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी सांगली आणि सांगलीकर.. . २५०