पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाव आलं. लोक आपापलं सोनं, किडूक- मिडूक बांधून त्यांच्या घरी आले. त्यांना दिलासा देत, त्या पेढीवरील बाळनाना गाडगीळ म्हणाले - "पुराचं पाणी कुठंपर्यंत चढेल देव जाणे ! तुमचे जे होईल तेच कदाचित् आमचे. आपण सर्वजण विश्वासाने आलात. ठीक आहे. आपापल्या जिन्नसांना नावाची चिठ्ठी लावून ठेवा.” सुदैवाने, सांगलीच्या गजाननाचे कृपेने पाणी ओसरू लागले. बाळनाना देवाचा धावा करत पायरीवर रात्रभर बसून होते. पूर ओसरला. लोकांनी आपापला माल परत नेला. कुणाचा एक तुकडाही गमावला नाही ! मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ या सराफी पेढीचं एकमात्र भांडवल कोणतं असं विचारलं, तर लोकांचा त्या पेढीच्या सचोटीविषयीचा 'प्रचंड विश्वास' हे एकच एक अत्तर संभवतं. गाडगीळांच्या पिढ्यांमागून पिढ्या बदलत्या. जिन्नस विकत घेणारी माणसं बदलली. पण एक गोष्ट बदलली नाही. अविचल राहिली. ती म्हणजे 'विश्वास.' १८३२ साली स्थापन झालेल्या या पेढीला आता नव्या सहस्रकात प्रवेश करताना १७० वर्षे होतील. या अवधीत अस्तित्वात आलेल्या अनेक सराफी पेढ्या मागे पडल्या. नामशेष झाल्या. पण गाडगीळांची सुवर्णपेढी मात्र आज एखाद्या वटवृक्षाप्रमाणे विस्तार पावत आहे. या १७० वर्षात गाडगीळांच्या ६-७ पिढ्या अलटून गेल्या. त्यामध्ये दाजीसाहेब होते, गणेशपंत होते, पुरूषोत्तमराव होते, वासुदेवराव होते; नावे अनेक पण सर्वच्या सर्व, शब्दाच्या खऱ्या अर्थाने 'विश्वासराव' होते हे महत्त्वाचे ! ही गाडगीळ मंडळी मूळ कोकणातली. गुहागरजवळील वेळणेश्वराची. गाडगीळ घराण्यातील कै. गणेश नारायण गाडगीळ सांगलीत स्थायिक झाले आणि १८३२ साली त्यानी सराफी पेढी स्थापन केली. आज ऐकायला गमतीचे वाटेल पण सुरूवातीच्या काळात ही सराफ मंडळी, सोन्याचांदीचे जिन्नस पडशीत भरून सराफ कट्ट्यावर जाऊन मांडायचे आणि संध्याकाळी पुन्हा पडशी भरून घरी न्यायचे अशी पद्धत होती. कारण त्याकाळी लोखंडी तिजोऱ्या नव्हत्या. गाडगीळांच्या पेढीवर पहिली तिजोरी आली ती १९१० साली. सराफी धंद्याबरोबरच गहाणवटाचा व्यवसायही ही पेढी करत असे. स्वातंत्र्यपूर्वकाळात, संस्थाने असताना दक्षिण महाराष्ट्रातील सर्व राजघराण्यांचे गाडगीळ सराफी दुकान हे मोठे विश्वासाचे ठिकाण होते. तत्कालीन ब्रिटीश अधिकारी मुद्दाम काही दागिने बनवून नेत असत. दाखवलेल्या वस्तुबरहुकूम नवीन जिन्नस बनवणे व काही वेळा स्वतःच्या कल्पनेप्रमाणे वस्तू बनवून देणे हे या पेढीचे वैशिष्ट्य होते. सोने, चांदी, मोती यांची पारख करण्यात सर्वच गाडगीळ वाकबगार आणि अनुभवाचा वारसा जुन्या पिढीकडून पुढील पिढीकडे सर्व बारकाव्यांसह चालत आला आहे; म्हणून तर आज सहावी-सातवी पिढी, पूर्वसूरींच्या दिमाखात सांगली आणि सांगलीकर.. . २४६