पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारचा सहकारी कायदा, त्यांनतरचा महाराष्ट्र राज्य सरकारचा सहकारी कायदा, अशा अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. हे कमी पडत होते म्हणून की काय, १९६६ पासून रिझर्व्ह बँकेची नियंत्रणे आली! पण या सर्व संक्रमणांमधून बँकेने यशस्वीपणे मार्ग काढला आणि आता सहकारी क्षेत्रात मोठ्या मानाचे स्थान बँकेने संपादन केले आहे. आजमितीला सांगली अर्बन बँकेच्या ३५ हून अधिक शाखा गावोगावी आहेत. इतकेच काय पण सांगलीखेरीज इतर अनेक ठिकाणी बँकेच्या कार्यालयांसाठी स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. बँकिंग व्यवहारांशिवाय, सांगली अर्बन बँकेने, सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवले आहे. मुख्यत्वे, आपापल्या कार्यक्षेत्रातील शिक्षण संस्थांच्या मागे ठामपणे अभे राहण्याचे धोरण बँकेने ठेवले आहे. म्हैसाळमधील कै. मधुकरराव देवल यांच्या मार्गदर्शनाखाली हरीजनांच्या सहकारी शेती-प्रकल्पामध्ये बँकेने मोठे आर्थिक योगदान दिले आहे. ५) सांगली बँक लि. : सांगली शहराची आणि पर्यायानी संस्थानची प्र व्हावयास हवी असेल तर येथील व्यापार पद्धतशीरपणे वाढला पाहिजे याची सांगलीच्या राजेसाहेबाना जाणीव होती. त्याच अद्देशाने त्यानी १९०७ साली सांगली गाव रेल्वेच्या फाट्यावर आणले. त्याचा सुपरिणाम दिसून येऊन सांगलीचा व्यापार वाढू लागला. राजेसाहेबांच्या प्रोत्साहनाने सांगलीची गणपती पेठ आणि नंतर वखारभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाची पद्धतशीर योजना झाली. (स्वातंत्र्योत्तर काळात हा वखारभाग सध्याच्या मार्केटयार्डात गेला). व्यापार म्हटला की हरघडीच्या व्यवहाराच्या बँकेची नितांत आवश्यकता आहे हे जाणून राजेसाहेबानी स्वतःचे भांडवल मोठ्या प्रमाणात घालून अन्य व्यापारी, सराफ दुकानदारांच्या सहकार्याने ५ ऑक्टोबर १९१६ रोजी सांगली बँकेची स्थापना केली. म्हणजे ८४ वर्षांची ही बँक सांगलीमधील सर्वात जुनी बँक आहे. ज्या बँकेचे भाडवल सुरवातीला अवघे १ लाख रुपयांचे होते ती बँक आता कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करत आहे. नेहमीचे बँकिंग व्यवहार बँक करतेच त्याशिवाय विदेश विनिमयाचे व्यवहारसुद्धा बँक करते. भारतातील सहा राज्यांमध्ये मिळून बँकेच्या १८४ शाखा आहेत. व्यापार आणि अद्योगक्षेत्रात सांगलीला या बँकेमुळे मोठे नाव मिळाले. - ६ ) १७० वर्षांची परंपरा असलेली, मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढी : १९१४ साली कृष्णा नदीला महापूर आला होता. त्यावेळी आजचा भव्य आयर्विन पूल नव्हता. महाबळेश्वरला धुवांधार पाऊस पडत असल्याने आणि आजच्यासारखी पाणी अडवणारी धरणे नसल्याने पाणी सतत वाढत होते. घराघरातून पाणी यायला लागले. गुरंढोरं वाहून जायला लागली. ऐन वेळेला अपयोगी पडणारं सोनं नाणं आता ठेवायचं तरी कुठं ? कुणाच्या तरी डोक्यात गाडगीळ सराफांचं सांगली आणि सांगलीकर.. . २४५