पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कायदा, ऑक्ट्रॉय ड्युटी, वीजदर वाढ असे काही ठळक विषय बघितले तरी चेंबरच्या बहुविध कामाची व्याप्ती कळून येते. याखेरीज चेंबरचे स्वतःचे प्रश्न आहेतच. व्यापारी- अद्योजक मेळावे, निरनिराळे वायदे बाजार, व्यापारी परिषदा अशा अनेक कामांचे व्याप चेंबरच्या पाठीशी असतात. बऱ्याच वेळा चेंबरला न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग चोखाळावा लागतो; अदा. जाचक कर, मार्केट अॅक्ट कायद्याची जाचक अंमलबजावणी, वीजदरवाढ आंदोलन, जकात वसुली वगैरे वगैरे. सांगली चेंबरच्या एका महत्वपूर्ण वैशिष्ट्याचे सर्वत्र कौतुक होते. ते म्हणजे चेंबरची सामाजिक बांधिलकी. समाज जीवनापासून, समाजावरील विविध आपत्तींपासून चेंबर कधी अलिप्त राहिली नाहीच पण सदैव सक्रिय सहभागच त्यामध्ये चेंबरने दिला. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून तो आजतागायत; खरं म्हणजे हा एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. १९१० च्या स्थापनेच्या दिवशी केवळ २१ सभासदांच्या सहभागापासून सुरवात झालेल्या या सांगली चेंबरचे आज ५४६ सभासद आहेत. ५० विविध व्यापारी संघटना संस्थेशी संलग्न आहेत. आज संस्थेची स्वतःची भव्य इमारत आहे. महाराष्ट्र चेंबर (१९२७) मराठा चेंबर (१९३४) या महाराष्ट्रातील प्रमुख संस्थांपेक्षाहि, सांगली चेंबर जुनी नामवंत संस्था असल्याने महाराष्ट्रात या संस्थेचा मोठा दबदबा आहे. ४) सांगली अर्बन को-ऑप. बँक लि. : सांगली अर्बन को. ऑ. बँकेची स्थापना ४ नोव्हेंबर १९३५ रोजी सांगली संस्थानच्या सहकारी कायद्याखाली झाली. ६५-६६ वर्षापूर्वी ही बँक स्थापन होण्यापूर्वी, सांगली गावात दोनच बँका अस्तिवात होत्या; आणि त्या दोन्ही बँका सांगली संस्थानच्या, म्हणजे श्रीमंत राजेसाहेबांच्या पुढाकाराने स्थापन झाल्या होत्या. पैकी सांगली बँक ही व्यापार व अद्योग क्षेत्रामधील लोकांसाठी होती, तर सांगली संस्थान मध्यवर्ती बँक (नंतर सांगली मध्यवर्ती जिल्हा बँक लि;) ही मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी होती. समाजातील दोन विभागांसाठी दोन बँका निघाल्या, मग समाजात जो मध्यम व गरीब वर्ग आहे, त्याना वाली कोण? अशा स्वरुपाच्या विचारमंथनातून कै. माधवराव गोडबोले यानी पुढाकार घेऊन या बँकेची स्थापना केली. दहा रुपयाचा एक शेअर याप्रमाणे रु.११००/-चे भाग भांडवल त्यानी जमविले. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकाश्रयातून या बँकेचा जन्म झाला. सांगलीची म्युनिसिपल हद्द, एवढ्याच कार्यक्षेत्रात, व्यवहार करणाऱ्या या छोट्या बँकेला, सांगली संस्थानचा सहकारी कायदा, संस्थानच्या विलीनीकरणानंतर निर्माण झालेला दक्षिण सातारा आणि नंतरचा सांगली जिल्हा, स्वातंत्र्यानंतरचा मुंबई सांगली आणि सांगलीकर. • २४४