पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिन्नसांच्या व्यापारासाठी, सांगलीच्या पूर्व-अत्तर भागात आखीव अशी बाजार पेठ वसविली गेली. ती म्हणजेच सांगलीची 'वखार पेठ.' (कालांतराने या पेठेचे सध्याच्या मार्केटयार्डात स्थलांतर झाले. ) या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली. मग ज्या ज्या गोष्टींमध्ये व्यापारी लोकांचे हितसंबंध जुळले आहेत, त्याबाबत एक समान धोरण राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली. आपापसात काही व्यापारसंबंधाने काही भांडणे निर्माण झाली, मतभेद अत्पन्न झाले तर काय करावे असा प्रश्न अत्पन्न झाला. या प्रश्नांवर तोडगा काढता यावा, सलोख्याने आपापले प्रश्न सोडवावेत, या भूमिकेतूनच मूलतः चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत व्यापारी मंडळीची सभा होऊन अशी संस्था स्थापण्याचा निर्णय झाला. या निर्णयाचा सुपरिणाम लागलीच दिसून येऊ लागला. व्यापारी मंडळींमध्ये आपल्या हितासंबंधी जागृती निर्माण झाली. अदाहरणार्थ, जवळ असलेल्या कोल्हापूरच्या तुलनेत सांगलीचा व्यापार का मागे पडतो ? कोल्हापूरला मिळत असलेल्या रेल्वेच्या सवलती आपल्याला का मिळू नयेत ? सांगली संस्थानच्या अधिपतींमार्फत आपण तशी खटपट का करू नये ? अशा स्वरुपाचे आत्मजागृतीचे प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात सजग झाले हा चेंबरच्या स्थापनेचा मोठाच फायदा झाला. कृष्णा नदीवर आजमितीस दिसणारा भव्य आयर्विनब्रिज हा सुद्धा चेंबरच्या सभासदांच्या व्यापारी आणि सामाजिक दृष्टीचेच फलित मानावे लागेल. अशा पुलाच्या अभावी आजूबाजूच्या गावातील लोकांचे अनेक प्रकारे हाल व्हायचेच; पण असा पूल बांधला तर अस्लामपूरपासूनचा सर्व व्यापारी माल, कऱ्हाड पेठेकडे न जाता सांगलीकडे येईल, सांगली पेठेची आवक वाढेल आणि त्याहूनहि महत्वाचे म्हणजे दस्तुरीचे अत्पन्न (जकात- दर) वाढेल असा व्यापारी मंडळींचा दावा होता. विशेष म्हणजे २५-३-१९१६ च्या चेंबरच्या वार्षिक सभेतच तशा आशयाचा ठराव करण्यात आला होता. १९२९ साली बांधल्या गेलेल्या या पुलामुळे वरील सर्व अंदाज अपेक्षेपेक्षाहि खरे ठरले ! यानंतरच्या काळात व्यापारात वाढ झाली तशी चेंबरच्या कामात वाढ झाली. कारण स्वातंत्र्यापूर्वी फक्त सांगली संस्थानचे कायदे होते पण स्वातंत्र्योत्तर काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कायद्यांमुळे व्यापाऱ्यांच्या समस्या वाढल्या आणि परिणामी चेंबरचे कार्यक्षेत्र वाढले. कामाचे स्वरूप बहुमुखी झाले. आज चेंबरला कोणकोणते विषय हाताळावे लागतात याची छोटीशी जंत्री बघितली तरी चेंबरच्या बहुविध कामाची कल्पना येते. मार्केट अॅक्ट, शॉप अॅक्ट, तंबाखू - जर्दा एक्साईज ड्युटी, गुळसाठा मर्यादा, जीवनावश्यक वस्तू कायदे-परवाने, मुद्रांक शुल्क दरवाढ, विक्रीकरातील बदल, दरवाढ, विक्रीकरातील बदल, खाद्यतेल आवेष्टीत सांगली आणि सांगलीकर.... २४३