पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आज ज्या ऑक्ट्रायवरून रणकंदने माजतात त्या कराची सुरुवात म्युनिसिपालिटीने १९३१ मध्ये केली. त्यावेळी 'टर्मिनल टॅक्स' या नावाने, सांगली शहरात आवक होणाऱ्या मालावर हा टॅक्स घेतला जात असे. सुरुवातीला हा टॅक्स मालाच्या वजनानुसार आकारला जाई. नंतर ऑक्ट्रॉय, मालाच्या किमतीवर घेतला जाऊ लागला; अर्थात् काही बाबतीत मालाच्या वजनावर सुद्धा आकारला जातो. १९५४ मध्ये या टर्मिनल टॅक्सचे या ऑक्ट्रायमध्ये रुपांतर झाले. एके काळी सांगली हवेसाठी प्रसिद्ध होते, (प्रदूषणापूर्वी) तसेच पाण्यासाठीहि होते. पाणीपुरवठा जास्तीत जास्त शुद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा यासाठी सर विश्वेश्वरय्या यांजसारख्या ख्यातनाम अिंजिनीअरकडून १९०७ साली, सांगली नगरपालिकेने पाहणी करवून घेतली होती. आज शेरीनाल्यामुळे पाण्याचा प्रश्न सर्वार्थानेच दूषित झाला आहे. खरं म्हणजे सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या या सांगली नगरपालिकेचा इतिहास यापूर्वीच ग्रंथरुपाने प्रसिद्ध व्हावयास हवा होता. पण १९९८ साली सांगली- मिरज-कुपवाड महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे, सांगली नगरपालिकेचे वेगळे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता त्या इतिहासाचे महत्त्व अरले नाही. पण या महापालिकेमुळे सांगलीची स्वतःची अशी जी एकजिनसी ओळख होती तिला मात्र बाधा आल्याची भावना कुणा सांगलीकराच्या मनात आली तर ती गैर मानता येणार नाही. ३ ) “चेंबर ऑफ कॉमर्स' - शतकपूर्तीकडे वाटचाल करणारी गौरवशाली संस्था : आता शतकाच्या अंबरठ्यावर असलेल्या सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली या संस्थेची रीतसर स्थापना १० जुलै १९१० रोजी, तत्कालीन सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत दुसरे चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने झाली. आधुनिक सांगलीची जडण-घडण पहिल्या चिंतामणराव पटवर्धन यांच्यामुळे झाली. या राजाने अगदी योजनाबद्ध रीतीने सांगलीत पेठा वसवल्या. जवळपासच्या व्यापारी लोकाना मुद्दाम निमंत्रित करून, त्याना विविध सुखसोयी अपलब्ध करून देऊन, किराणा, भुसारा, कापड, सराफी वगैरे प्रकारची दुकाने घालण्यास अत्तेजन दिले. सांगलीची भौगोलिक रचना, व्यापार-अदीमास अनुकूल आहे. कृष्णा, वारणा, वेरळा यासारख्या जवळपासच्या नद्यांमुळे समृद्ध झालेल्या या भागातून भुईमूग, हळद, मिरची, तंबाखू, कापूस हा माल सांगलीच्या पेठेत मोठ्या प्रमाणावर येतो. १९०७ साली सांगलीला रेल्वेचा फाटा प्रथमच आला. त्यामुळे त्याचा सांगलीच्या व्यापार वाढीवर अनुकूल परिणाम झाला. शेंग, हळद, गूळ, मिरची, तंबाखू, या सांगली आणि सांगलीकर.. . २४२