पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कॅसेटहि दाखवल्या जातात. तिसऱ्या मजल्यावर अद्योगरत्न वेलणकर सभागृह आहे. त्याचा अपयोग सांस्कृतिक आणि सामाजिक कामांसाठी केला जातो. या नगरवाचनालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथ देवघेवीसाठी वाचकांना 'मुक्त प्रवेश' आहे. राज्यस्तरावर 'अ' वर्गातील अत्कृष्ट ग्रंथालय म्हणून या वाचनालयास राज्य शासनाने १९८६ सालीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिला आहे. बँकिंग क्षेत्रात जशी जिल्ह्याजिल्ह्यात 'लीड बँक' असते तेच स्वरूप या वाचनालयाचे सांगली जिल्ह्यात आहे. तालुका आणि ग्रामीण वाचनालयांना 'सांखळी' योजनेतून राज्य सरकारने दिलेली पुस्तके पुरवली जातात. वाचनालयातर्फे ग्रामीण भागात ग्रंथप्रदर्शने भरवली जातात. वेळोवेळी भरवल्या जाणाऱ्या मेळाव्यांतून जिल्ह्यातील ग्रंथ कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले जातात. त्यांच्यासाठी भाषणे आयोजित केली जातात. आजमितीला या वाचनालयातील ग्रंथसंग्रह ८६,००० च्या वर आहे. लौकरच हा संग्रह लाखाच्या घरात जाईल. वाचनालयाच्या वतीने सांगलीत आणखी काही अन्य ठिकाणी, वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकांची देवघेव चालते. रोटरी क्लब सांगली सिटी आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या आर्थिक सहकार्याने वाचनालयाचे संपूर्ण संगणकीकरण नुकतेच जवळपास पूर्ण झाले आहे. सभासद संख्या आता २००० च्या वर आहे. त्याखेरीज मुक्त वाचनालयाचा (वृत्तपत्रे - मासिके वगैरेसाठी) फायदा हजारो लोक घेत असतात. संस्थेचे पदाधिकारी-कार्यकारी मंडळ यांच्या डोळस प्रयत्नाने ही संस्था म्हणजे एक सांस्कृतिक व्यासपीठ बनले आहे. भावगीत, वक्तृत्व, पाठांतर, कथाकथन स्पर्धा, चर्चासत्रे, ज्ञानसत्रे, ग्रंथप्रदर्शने यामुळे नगरवाचनालय म्हणजे सांगली नगरीचे वैभवशाली सांस्कृतिक केंद्रच बनले आहे. २) सव्वाशे वर्षांची ' सांगली नगरपालिका' : थोरल्या चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धनानी मिरज जहागीरीतून फुटून, 'सांगली' आपल्या जहागीरीची राजधानी केली; त्यावेळी सांगली गाव फक्त सहा गल्लीत सामावलेलं होतं. १८०० च्या सुमारास चिंतामणरावानी पेठा आखून गाव पद्धतशीपणे वसवण्यास प्रारंभ केला. १८६४ मध्ये गावात 'शहर सफाई कचेरी' स्थापन झाली. आणि प्रत्यक्ष म्युनिसिपालिटीची (म्हणजे नगरपालिकेची; हा शब्द नंतर रूढ झाला) स्थापना, तत्कालीन ब्रिटीश अॅड्मिनिस्ट्रेटर मेजर वेस्ट यानी २१ फेब्रुवारी १८७६ रोजी केली. म्हणजे सध्याच्या महानगरपालिकेच्या पोटात असलेली सांगली नगरपालिका स्थापन होऊन आता जवळजवळ सव्वाशे वर्षे झाली. सुरवातीचा सांगली नगरपालिकेचा कारभार, मूळ गावभाग, पेठभाग, गणपतीमंदिर परिसर आणि गणेशदुर्ग परिसर एवढ्या भागापुरताच मर्यादित होता. जसजसे कृष्णा नदीच्या महापूराचे पाणी लोकवस्तीला सांगली आणि सांगलीकर... • २४०