पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वास्तूची गरज संस्थेला भासू लागली. तत्कालीन प्रशासक बर्क याना अनेकवार विनंती केल्यावर त्यांनी मोलाची मदत केली. सध्याची, राजवाडा चौकातील मध्यवर्ती ठिकाणी त्यानी जागा दिली आणि ३६ x १८' ची इमारत बांधण्यासाठी रु.४२००/- अनुदानाच्या स्वरुपात दिले. नव्या वास्तूत आल्यानंतर मात्र वाचनालयाची खऱ्या अर्थाने भरभराट सुरू झाली. व्याख्याने, चर्चासत्रे आदी अपक्रम वाढू लागल्यावर मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली. संस्थेला आर्थिक दृष्ट्या मजबूती आणण्याची गरज जाणवू लागली तेव्हा व्यावहारिक विचार करून जुनी इमारत पाडून मोठी वास्तू बांधण्याचे ठरले. १९५८-५९ ते १९७० पर्यंत काम चालत चालत सध्याची टोलेजंग इमारत अभी राहिली. दरम्यानच्या काळात वाचनालय टिळक स्मारक मंदिरामध्ये हलवण्यात आले होते. ‘वाचकांसाठी पुस्तके, वर्तमानपत्रे संग्रहित करणे' या सुरुवातीच्या प्राथमिक हेतूपासून तो ‘जनतेत चांगल्या ग्रंथांची वाचन - अभिरूची अत्पन्न करून तिच्यामध्ये म्हणजे जनतेमध्ये बौद्धिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे' या व्यापक अद्देशापर्यंत वाचनालयाची व्याप्ति वाढली आहे. सध्याच्या तीन मजली अिमारतीच्या पहिल्या मजल्यावर पुस्तक - संग्रह आहे. आणि तिथेच पुस्तकांची देवघेव चालते, संस्थेचे ऑफिसहि पहिल्या मजल्यावरच आहे. दुसऱ्या मजल्यावर मुक्तद्वार वाचनालय आहे. वाचकांना इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी आणि कन्नड भाषेतील मासिके, वृत्तपत्रे विनामूल्य वाचावयास मिळतात. कै. बापूसाहेब दप्तरदार संदर्भ विभागात, गेल्या सहा महिन्यातील वृत्तपत्रे संदर्भासाठी मिळू शकतात. कै. सौ. कालिंदीबाई साने बाल-विभागात, छोट्या मुलांची सोय आहे. चार हजारांहून अधिक पुस्तके त्याना तिथे वाचायला मिळू शकतात. शिवाय मासिके, पाक्षिकेहि वाचावयास मिळतात. कै. सौ. अिंदुमती टिळक महिला विभागात, महिलांसाठी वाचनाची विनामूल्य स्वतंत्र व्यवस्था आहे. या विभागातर्फे स्त्रियांना वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्यासाठी भावगीत स्पर्धांचे आयोजन केले जाते तसेच महिलांसाठी वासंतिक हळदी-कुंक समारंभ प्रतिवर्षी आयोजित केले जातात. 'टिळक अभ्यासिका' या विभागात गरजू विद्यार्थ्याना आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याना अभ्यासासाठी जागा अपलब्ध करून दिली जाते. कै. के. वा. जोशी नाट्यविभाग हे एक वैशिष्ट्यपूर्ण दालन आहे. या स्वतंत्र नाट्यविभागात, अगदी दुर्मिळ अशी नाट्यपुस्तके आहेत. २६१४ पुस्तकांचा दुर्मिळ असा हा महाराष्ट्रातील एकमेव संग्रह असावा. नाटकांशी संबंधित व्यक्तिनाच वा संस्थेला विनामूल्य वाचनासाठी पुस्तके यामधून दिली जातात. राजा राममोहन रॉय फाअंडेशनकडून मिळालेल्या रंगीत टी. व्ही. वरून ठराविक कार्यक्रम रोज दाखवले जातात. तसेच ब्रिटीश कौन्सिल, न्यूजट्रॅकतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या व्ही.डी.ओ. सांगली आणि सांगलीकर.. .२३९