पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगलीतील काही नामवंत संस्था सांगलीतील कर्तबगार व्यक्तिनी, जसं वैयक्तिक पातळीवर सांगलीचं नाव गाजवलं, तसंच काही संस्थांमुळे सांगली नावाजली गेली. सांगली नगरीला अशा संस्था भूषणभूत झाल्या. विविध क्षेत्रात अशा अनेक संस्था आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे या संस्थांचा यथोचित परिचय करून देणे हाच एक मोठ्या ग्रंथाचा विषय. कोणी तरी तसा प्रयत्न करायला हवा. अिथे फक्त प्रातिनिधिक स्वरुपातच काही संस्थांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे : - १) सांगली (जिल्हा) नगरवाचनालय एक सांस्कृतिक व्यासपीठ : सांगलीचे सुप्रसिद्ध साहित्यिक कै. वि. स. खांडेकर यानी लेखक म्हणून झालेल्या आपल्या जडण-घडणीत सांगली नगरवाचनालयाचा मोठा वाटा होता असं प्रांजळपणाने सांगितलं आहे. असे हे वाचनालय आता वयाने १३२ वर्षांचे झाले आहे. या नामवंत संस्थेची स्थापना १८६९ साली झाली. याचे बरेचसे श्रेय रावसाहेब बाळकृष्ण स. मोने या सद्गृहस्थाकडे जाते. सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत धुंडीराज तथा तात्यासाहेब पटवर्धन याना इंग्रजी शिकवण्यासाठी श्री. मोने यांची नेमणूक झालेली होती. त्यांना वाचनाची आवड होती. त्यानीच पुढाकार घेऊन हे वाचनालय सुरु केले. पहिली आठ-दहा वर्षे वाचनालयाची व्यवस्था पूर्ण सरकारी होती. पुढे वाचनालयाची व्यवस्था वर्गणीदार सभासदांकडे देण्यात आली तसे त्याचे स्वरूप सार्वजनिक झाले. पहिली काही वर्षे या संस्थेचे प्रचलीत नाव 'बुक क्लब' किंवा 'सांगली लायब्ररी' असे होते. संस्थेची पहिली घंटना १८९६ साली तयार करण्यात आली आणि त्या घटनेनुसार 'सांगली जनरल लायब्ररी' असे नाव ठेवण्यात आले. अॅडमिनिस्ट्रेटर बर्क यांच्या काळात तर ब्रिटीश धाटणीनुसार या संस्थेचे नाव 'सांगली नेटीव्ह जनरल लायब्ररी' असे लावण्यात येऊ लागले. मात्र १९२४ साली संस्थेची घटना जेव्हा प्रथमच छापून घेण्यात आली, तेंव्हा 'नगरवाचनालय' असे मराठी नामांतर करताना वरील इंग्रजी नावास फाटा देण्यात आला ! हा नामांतराचा प्रवास १९५० साली शासनाकडून जिल्हा वाचनालयाचा दर्जा मिळाल्यानंतर संपला. आणि १९५० च्या घटनेत नोंद करून, 'सांगली (जिल्हा) नगर वाचनालय' असं नाव रूढ करण्यात आलं. हे वाचनालय सुरुवातीच्या काळात केंगणेश्वरी चौकात आणि नंतर पांजरपोळाच्या वास्तूत 'वस्तीला' होते ! जसजशी सभासद संख्या वाढू लागली तसतशी स्वतःच्या सांगली आणि सांगलीकर.. .२३८