पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नारळ, पुण्याच्या चतुःशृंगी भागात एक टुमदार बंगला आहे. मुख्य बंगल्याच्या चारी बाजूना भरपूर रिकामी जागा आहे. त्यावर सर्व प्रकारची झाडे, अगदी कलमी आंबा, , पोफळी, पेरू, सीताफळ, चिकू, जांभूळ, कवठ, रामफळ, चिंच, या फळझाडां- पासून ते अगदी गुलाब, जाई-जुई मोगरा, झेंडू, तगर, सोनचाफा, डेलिया यापर्यंत अनेक फुलझाडे आहेत. या फळाफुलांखेरीज वड, पिंपळ, अन्हाळ्यात फुलणारे लालचुटुक गुलमोहर अशी अनेक झाडे आहेत. या घरात राहणाऱ्या मुलाला 'माझे घर' या विषयावर शाळेत निबंध लिहायचा प्रसंग आला. तेव्हा घराचे वर्णन लिहिता लिहिता त्याने सर्व फळझाडांची, फुलझाडांची नावे लिहिली. निबंध तपासणाऱ्या बाई चकित झाल्या. त्याना अतिशयोक्ती वाटली. अशी घरं आजकाल कुठं असतात का ? एवढी जागा असलेले घर केव्हाच बिल्डरच्या घशात गेलं असतं ! असा विचार करुन केवळ कुतुहलापोटी त्यानी त्या मुलाच्या नकळत, शाळेच्या मधल्या सुट्टीत इतर दोन मुलांना त्याच्या घरी पाठवले. सगळ्या वृक्षवल्लींची यादी करायला. मुलं परत आली. बाईना म्हणाली 'अहो, त्यांच्या अंगणात याहूनही अधिक झाडे आहेत. किती तरी नावे लिहायला हाच विसरलाय ! ' आपल्याच गावातील कर्तृत्ववान सांगलीकरांची मोजदाद करताना, वरील मुलासारखीच प्रस्तुत लेखकाची अवस्था झालीय ! सांगली आणि सांगलीकर.. . २३७