पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

‘शांतिनिकेतन' या निसर्गरम्य परिसरात, १ जुलै १९६८ रोजी ही संस्था सुरु झाली. चित्रकलेच्या सर्व अंगांचे शास्त्रशुद्ध शिक्षण, तज्ञ अध्यापकांकडून या संस्थेत दिले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात, स्वतंत्र 'कलादालन' असणारे एकमेव महाविद्यालय असावे. त्यामुळे सांगलीची कलापरंपरा मोठ्या गौरवशाली मार्गाने वाटचाल करेल यात शंकाच नाही. सांगली परिसरात, कलावंत मंडळींची, आता एवढी प्रचंड क्षमता (Potential) आहे की सांगलीत एक मोठी 'आर्ट गॅलरी' लौकरात लौकर निर्माण होणे आवश्यक आहे. कलापरंपरेत आता फोटोग्राफीचाही अल्लेख करणे अगत्याचे आहे. जुन्या संस्थानी काळातील कै. सखारामपंत घारपुरे याना या क्षेत्रातील 'पायोनिअर' म्हणायला हरकत नाही. त्यापाठोपाठ व्ही. जी. लिमये, जप्तीवाले, धामणीकर, चिवटे अशी अनेक नावे डोळ्यासमोर येतात. त्यात नाना धामणीकरानी, प्रेस फोटोग्राफीत मोठे नाव कमावले. आता तर या क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली आहे. सांगलीच्याच गोपाळराव बोधे या छायाचित्रकाराने, जागतिक स्तरावर फोटोग्राफीत सांगलीचे नाव अच्चस्थानावर नेले आहे. अलीकडेच त्यानी कौतुकाने आपल्या सांगली गावात भरवलेल्या भव्य प्रदर्शनाला रसिकानी तीन दिवस अलोट गर्दी केली होती. 'हॉबी सर्कल, 'प्रतिबिंब' अशा सांगलीतील संस्थांमुळे हौशी, धंदेवाईक छायाचित्रकारांची सध्या रेलचेल आहे. अशा संस्था वेळोवेळी जी प्रदर्शने भरवतात, त्यातून नवीन छायाचित्रकारांना मोठेच प्रोत्साहन मिळते. सराफी परंपरा : सांगलीची सराफी परंपरा ही पण वैशिष्टयपूर्ण आहे. सांगली घाटाची चांदीची भांडी पूर्वी फार प्रसिद्ध होती. संपूर्ण महाराष्ट्रात या भांड्यांचा मोठा बोलबाला होता. यंत्रे आल्यावर मात्र आता पूर्वीसारखी भांडी बनवली जात नाहीत. सोन्याच्या अलंकारातील नाजूक आणि कुशल कारागीरीसाठी सांगली पेठेची मोठी प्रसिद्धी आहे. नेकलेस, अंगठ्या, बुगड्या, कर्णफुले, बांगड्या या अलंकारांप्रमाणेच अनेक बारीक कलाकुसरीचे दागिने सांगलीत बनविले जातात. १९६३ च्या सुवर्ण नियंत्रण कायद्याचा फटका, त्यावेळी जसा सराफाना बसला तसाच तो कुशल कारागीरानाही बसला. सांगलीची औद्योगिक परंपरा : हा मोठाच विषय आहे. त्या संदर्भात पुस्तकात इतरत्र बरीच माहिती आलेली आहेच. सांगलीतील सामाजिक परंपरा : सांगलीतील सामाजिक सुधारणांच्या परंपरेची सुरवात नाट्यचार्य देवल यांच्या शारदा नाटकापासूनच सांगलीत सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही. सांगलीचे राजेसाहेब आणि त्यांच्या सुसंस्कृत पत्नी सांगली आणि सांगलीकर.. २३४