पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंडळाचा अल्लेख याआधी आलेला आहेच. या सर्वांच्यामुळे महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती' पुरस्कार अनेक सांगलीकरानी मिळविलेला आहे. मारुती माने (कुस्ती) अनिल पाटील (वेटलिफ्टिींग), सौ. भाग्यश्री साठे ठिपसे (बुद्धिबळ) नसरुद्दीन नायकवडी (कुस्ती), बशीर शेख (वेटलिफ्टिंग), श्रीराम भावसार (कबड्डी), सुजाता नवले-कल्याणी (व्हॉलीबॉल), अण्णासाहेब गोटखिंडे (क्रीडासंघटक ), भाऊसाहेब पडसलगीकर (क्रीडा - प्रतिनिधी ) स्वाती करंदीकर (कबड्डी) असे काही ठळक अल्लेख. ‘पौरुष’ पारितोषिक विजेते व अंटार्टिकावरील मोहिमेचे कमांडिंग ऑफीसर कर्नल जगदीश खाडिलकर हे सांगलीचेच. कला परंपरा : सांगली संस्थान, जवळच्या कोल्हापूर संस्थानाइतके मोठे नव्हते. किंबहुना कोल्हापूरला (ज्याचा अल्लेख कौतुकाने कलापूर असा केला जातो) चित्रकला, शिल्पकला आदी बाबीना जसा राजाश्रय, धनिक सरदारमंडळींचा मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय लाभला, तसा प्रकार सांगलीत नव्हता. तथापि अलीकडच्या ५०-६० वर्षांच्या काळात सांगलीच्या कलाकारानी कलाक्षेत्रात स्पृहणीय कामगिरी बजावली. त्यामधील पायाभरणीचे काम, थोर चित्रकार, कै. पंत जांभळीकर यानी केले यात शंकाच नाही. १९३० साली मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या डिप्लोमा परीक्षेत फर्स्ट क्लास मिळून, त्याना त्या संस्थेची फेलोशिप मिळाली होती. तैलरंगातील आणि जलरंगातील त्यांची गाजलेली चित्रे, अनेक रसिकांच्या, संस्थांच्या दालनांची शोभा वाढवत आहेत. त्यांचे त्याहून महत्वाचे कार्य म्हणजे गुरूकुल पद्धतीने, चित्रकलेच्या सर्व प्रकारांचे ज्ञान देऊन, त्यानी मोठ्या प्रमाणावर शिष्य परंपरा निर्माण केली. त्यांच्यानंतर, माधवराज गुजर, अण्णासाहेब चौगुले, नाना पोतदार, ओतारी, वेदपाठक यासारख्या अनेक मंडळीनी, दिमाखात ही कला परंपरा पुढे नेली. ओतारी मंडळीनी शिल्पकलेतही मुसंडी मारली. जागोजागी अभे असलेले पुतळे त्याचे साक्षी आहेत. वेदपाठक मंडळींचे गणेशोत्सवातील देखावे, वैशिष्ट्यपूर्ण साईनबोर्डस् यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तात्यासाहेब वेदपाठकानी १९६४ च्या मडगाव-गोव्याच्या साहित्य संमेलनानिमित्त २०० फूट लांब आणि ३५ फूट अंच, अशा भव्य प्रवेशद्वाराचे केलेले डेकोरेशन फार नावाजले गेले होते. अलीकडच्या काळातील कल्याणराव शेटे यांच्या कलाकृतीनी सांगलीचे नाव सर्वतोमुखी केले. पंढरपूरच्या देवळातील रुक्मिणी आख्यानावरील त्यांची चित्रमालिका खूप गाजली. ही पेंटिंग्ज, राजा रविवर्माच्या चित्रांची आठवण करून देतात असे धन्योद्गार, जागतिक कीर्तीचे चित्रकार, एफ्. एम्. हुसेन, एस्. एम्. पंडित आदी मंडळीनी काढले होते. कल्याणरावांची ५-६ हजारांहून अधिक चित्रे, महाराष्ट्रात सर्वत्र आणि महाराष्ट्राबाहेर पोचली आहेत. आता तर सांगलीमधे 'कलाविश्व महाविद्यालय' उभे आहे. सांगलीच्या सांगली आणि सांगलीकर. .२३३