पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गौरवशाली परंपराच सांगलीमध्ये निर्माण केली. सांगली हायस्कूल आणि सिटी हायस्कूल मधील नामफलक बघितले म्हणजे किती तरी गुणवंत शंकरशेट स्कॉलर्स आढळतील. त्यातूनच अनेकजण आय.सी.एस. अधिकारी झाले. पं. महादेवशास्त्री जोशी यांचे सांगलीच्या वेदशास्त्रशाळेत शिक्षण झाले होते. प्राच्याविद्या संशोधक ग.वा. तगारे सांगलीचेच. सहकार : वसंतदादांमुळे सांगली जिल्ह्यात सहकारक्षेत्राचे जाळेच विणले गेले. या क्षेत्रात राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील, धुळाप्पाण्णा नवले, आबासाहेब खेबूडकर, माधवराव गोडबोले, चारूभाई शहा वगैरे मंडळीनी मोठेच योगदान दिले. आज सांगलीत अनेक क्षेत्रांमध्ये 'सहकार' हा परवलीचा शब्द बनला आहे. वैद्यक : वि.स. खांडेकरांनी ज्यांचं वर्णन, 'मला भेटलेला देवमाणूस' अशा शब्दांमध्ये केलं होतं ते परोपकारी डॉक्टर, हरी श्रीकृष्ण देव, डॉ. व्ही. एन. देसाई, डॉ. बापट अशा अनेक डॉक्टरांचा अल्लेख नामवंत सांगलीकरांमध्ये करायला तर हवाच, पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा स्वतंत्रपणे मागोवा घ्यायला हवा. आजमितीला नेत्रतज्ञ, डॉ. भय्यासाहेब परांजपे यांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. नुकतेच दिवंगत झालेले ख्यातनाम साहित्यिक आणि महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणून सार्थपणे ज्यांचा अल्लेख केला जातो, ते पु. ल. देशपांडे, डोळ्यांवर अपचार करून घेण्यासाठी मुद्दाम या भय्यासाहेबांकडे येऊन रहात असत. आयुर्वेदाची सांगलीत जुनी परंपरा आहे. खुद्द आबासाहेब सांबारे यांचे दोन्ही बंधू निष्णात वैद्य होते. वेलणकर, वझे, दातार, जोशी, अशा अनेक मंडळीनी जुनी वैद्यकी चालू ठेवली. आज तर अॅलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे बघितले जाते. त्यामुळे डॉक्टरांबरोबरच आयुर्वेद वैद्यांचीहि सांगलीत मोठी संख्या आहे. क्रीडापरंपरा : सांगलीची क्रीडापरंपरा ही पण अभिमानास्पद आहे. विजय हजारे, नंदू नाटेकर, हरिनाना पवार, यांचा या पुस्तकात अल्लेख आलेला आहेच. त्याखेरीज नामवंत क्रीडापटुंमध्ये, व्यंकाप्पा बुरुड, ज्योतिरामदादा सावर्डेकर, मारुती माने, गणपतराव आंदळकर अशा सांगलीशी संबंधित मल्लांचा अल्लेख करावा लागेल. या पैलवानमंडळीनी सांगलीचा नावलौकिक कुस्तीक्षेत्रात वाढवला. सांगलीच्या तरुण- तरुणीना, बालवयापासून क्रीडाक्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा लाभल्या पाहिजेत, अत्कृष्ट मैदान मिळालं पाहिजे, यासाठी क्रीडासंघटक अण्णासाहेब गोटखिंडे यानी फार परिश्रम घेतले. तरुणभारत, आझाद व्यायाममंडळ, विजयंता व्यायाममंडळ, समर्थ व्यायाम मंडळ, अशा अनेक संस्थांच्या प्रयत्नांमुळे क्रीडाक्षेत्रात सांगली अग्रेसर राहिली आहे. बुद्धिबळ प्रशिक्षक भाऊसाहेब पडसलगीकर आणि त्यांच्या नूतन बुद्धिबळ सांगली आणि सांगलीकर.. .२३२