पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोहितेना विसरता येत नाही. बाळकृष्णबुवांची तर पेटीवादनाची तयारी एवढी विलक्षण होती की अनेक जाणकार त्यांची तुलना गोविंदराव टेंबे यांच्या पेटीवादनाशी करत असत. अनेक नामवंत गायक-गायिकांना त्यानी साथ केली होती; किंबहुना त्यामधील अनेकजण बाळकृष्णबुवाना मुद्दाम पाचारण करत. त्यांचा स्वतःचा कमालीचा संकोची स्वभाव, प्रसिद्धीविन्मुख वृत्ती, आणि सांगलीसारख्या, पुण्या-मुंबईच्या तुलनेत छोट्या गावातील वास्तव्य, यामुळे त्यांच्या पेटीवादनातील नैपुण्याचा किंवा त्यानी स्वतः तयार केलेल्या २२ श्रुतींच्या हार्मोनिअमचा व्हावा तसा बोलबाला झाला नाही. हिराबाई बडोदेकरांची गायकी तंतोतंत आत्मसात करणाऱ्या आणि नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकरांच्या स्नुषा असणाऱ्या इंदिराबाई खाडिलकरानी, संगीत, नाट्य-संगीत क्षेत्रात सांगलीचं नाव चांगलंच गाजवलं. तीच संगीत परंपरा आता सांगलीच्या आशा खाडिलकर, वर्षा भावे पुढे नेत आहेत. आशा खाडिलकरांचं कौतुक म्हणजे त्यांच्या गुरु, माणिक वर्मा यांच्याप्रमाणेच त्या शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये पारंगत आहेत. भावगीत गायनातील ज्येष्ठ गायक जे. एल. रानडे हे सांगलीचेच. खुद्द गजाननराव वाटवे सांगली गावाशी अनेक वर्षे संबंधित आहेत. जुन्या जमान्यातील बाळ कारंजकर यानी सुद्धा भावगीत गायनात नाव कमावलं. आजमितीला मंगला जोशी, मंजिरी असनारे आणि मंजुषा कुलकर्णी या तीन 'मं' कारित - संगीत गायिका शास्त्रीय संगीतात सांगलीचं नाव सर्वत्र दुमदुमवत आहेत ही सांगलीकरांच्या अभिमानाची गोष्ट आहे. सांगली आणि पत्रकारिता : १९३७ मध्ये सांगलीत 'दक्षिण महाराष्ट्र' आणि 'विजय' ही साप्ताहिके निघू लागली. तेव्हापासून सांगलीला पत्रकारितेची परंपरा आहे. या पत्रकारितेच्या क्षेत्रात, सदाशिवराव फडके. ह. गो. टिळक, भ.अं. तथा बापूसाहेब दप्तरदार, त्यांचे बंधू गणपतराव दप्तरदार, रामभाऊ जामदार, बी. जी. (काका) कुलकर्णी, गजाननराव भोसले, राष्ट्रशक्तीचे दीनानाथ भोसले अशी अनेकांची नावे घ्यावी लागतील. पुण्याच्या 'केसरी' चे संपादक अरविंद व्यं. गोखले हे मूळचे सांगलीचेच. आजमितीला सांगलीहून लोकमत, पुढारी, सकाळ, दक्षिण महाराष्ट्र केसरी, अशा अनेक वृत्तपत्रांचे प्रकाशन होते. त्याशिवाय राष्ट्रशक्ती, अग्रदूत, नवसंदेश, प्रभातदर्शन, जनप्रवास, ललकार यांसारखी दैनिके आज सांगलीत आहेत. 'विजयंत', 'बिझनेस एक्स्प्रेस' यांसारखी साप्ताहिकेही सांगलीतून निघतात. संस्कृत परंपरा : श्रीपादशास्त्री देवधर, पाटीलशास्त्री, केशवराव दीक्षित अशा संस्कृत पंडितांनी, मुंबई विश्वविद्यालयाच्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती विजेत्यांची सांगली आणि सांगलीकर.. .२३१