पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाले. पुण्याच्या 'सकाळ' या वृत्तपत्रासाठी त्यांनी विलिंग्डन महाविद्यालयाचा विद्यार्थी- वार्ताहर म्हणून आपल्या पत्रकारितेची सुरवात केली होती. सुदैवाने अनेक छोट्या- मोठ्या लेखकांनी सांगलीच्या साहित्य परंपरेचा वारसा समर्थपणे आज चालवलेला आहे. यथाकाल त्यांचा परामर्श घेतला जाईलच. सांगली आणि नाट्य : नाट्याच्या बाबतीत तर काय सांगली ही बोलून चालून नाटयपंढरीच आहे. या पुस्तकात अल्लेखलेल्या दिग्गजांबरोबरच सांगलीत नाट्यपंरपरेची पताका दिमाखात पुढे नेणाऱ्या मान्यवरांमध्ये मामा भट, बंडोपंत सोहनी, रघुनाथ इनामदार, बाबूराव नाईक, प्रा. जगन्नाथराव आठवले, विनायकराव पाटणकर, जगन्नाथराव पाटणकरांपासून आजकालच्या अर्चना जोगळेकर, माधव खाडिलकर, डॉ. गिरीश ओक अशा अनेक नामवंतांनी नाट्यक्षेत्रात चौफेर मुलुखगिरी केली आहे. रंगभूमीवर काम करता करता, अॅड. मधुसूदन करमरकर, यशवंत केळकर, अरुण नाईक, प्रा. दिलीप परदेशी, डॉ. मधु आपटे यांच्यासारखे नवे नवे नाटककार अदयास आले. चित्तरंजन कोल्हटकर, अदयराज गोडबोले ही मंडळीपण सांगलीचीच. मा. दीनानाथ, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, विश्राम बेडेकर यासांरख्या दिग्गजांचे सांगलीत काही काळ वास्तव्य होते. पहिली व्यावसायिक नाटक मंडळीपण सांगलीतच अभी राहिली. विष्णुदास भावे यानीच 'सांगलीकर नाटक मंडळी' ही संस्था स्थापन करुन राजाश्रयाखाली असलेली मराठी रंगभूमी, प्रथमच लोकाश्रयाकडे वळवली. पुढे बळवंतराव मराठे यानी 'नूतन सांगलीकर नाटक मंडळी' स्थापन केली. म्हणजे आजमितीला फोफावलेल्या नाटक-कंपन्यांची मुहुर्तमेढ सांगलीतच झाली होती. देवल स्मारक मंदिर, भावे नाटयमंदिर, ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असो. सस्नेह, अॅक्टिव्ह ग्रुप अशा अनेक संस्था आज सांगलीत कार्यरत आहेत. संगीत नाट्य-परंपरा पुढे नेणारे नवीन नवीन गुणवंत तरुण अदयास येत आहेत. विस्तारभयास्तव सर्वांचा नामोल्लेख करता येत नाही. सांगली आणि संगीत : मात्र नाटकाइतकी थोर अशी संगीतपरंपरा सांगलीपेक्षा मिरजेला अधिक आहे. सांगली-मिरज हा परिसर भौगोलिकदृष्टया वेगवेगळा दिसत असला तरी सांस्कृतिकदृष्टया एकमेकांत इतका मिसळून गेला आहे, की कधी कधी वेगवेगळे ओळखू येत नाही. त्यामुळेच पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, अब्दुल करीम खाँ सारखे संगीत-महर्षि सांगलीचेच वाटतात. काळेबुवा, गोडबोलेबुवा (रंगभूमीवरील अदयराज गोडबोले यांचे वडील), गणपतराव डवरी, गुरव मंडळी यांच्यापासून चिंतुबुवा म्हैसकर, रत्नाकर दिवाकरांपर्यंत अनेकांनी सांगलीतील संगीतपरंपरा जपलेली आहे. हार्मोनिअम वादक नाना ताडेना जसं विसरता येत नाही तसं बाळकृष्णबुवा सांगली आणि सांगलीकर. .२३०