पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तुत लेखकाकडे जातो. त्यांचा अल्लेखहि कालानुक्रमे न होता विस्कळीतपणे झाला आहे. सांगली आणि साहित्य : साहित्यक्षेत्रातील सहज आठवणारं नाव म्हणजे नाटककार न. ग. कमतनूरकर यांचं. त्याना राम गणेश गडकऱ्यांचा पट्टशिष्य असल्याचा सार्थ अभिमान होता. त्यांच्या 'श्री' 'सज्जन' आणि 'स्त्री-पुरूष' या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली होती. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची सन्मानाने निवड झाली होती. त्यांच्याबरोबरीने त्यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनीबाईंचे नाव घ्यायला हवं. अनेक बंगाली कादंबऱ्यांची त्यानी मराठी भाषांतरे केली होती. त्या सध्या मुंबईस असतात. ८५-९० च्या आसपास त्यांचं आता वय आहे. मुंबईतील गोरेगाव भागात त्या राहतात. प्रस्तुत लेखकाने आवर्जून त्यांची भेट घेतली होती पण न.ग. कमतनूकरांविषयी संपूर्ण लेख लिहिण्याइतकी माहिती न मिळाल्याने तसा प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा लागला. मूळ रहिमतपूरचे असलेले कवी गिरीश (प्रा.शं. के. कानेटकर) सांगलीकरच म्हणायला हवेत, अितकं त्यांचं सांगलीत दीर्घकालीन वास्तव्य होतं. त्यांच्या वाङमयीन कर्तृत्वाविषयी वेगळे काही लिहिण्याची आवश्यकता नाहीच. अलीकडेच झालेल्या त्यांच्या जन्मशताद्विनिमित्ताने त्याला नव्याने अजाळा मिळालाय. जुन्या विश्रामबाग स्टेशनसमोर असलेला त्यांचा 'कांचन' बंगला अनेक होतकरु साहित्यिकांचे आश्रयस्थान होता. खुद्द पु.ल. देशपांडे त्यांच्या छायेखाली एम.ए.च्या अभ्यासासाठी येऊन राहिले होते. कवी गिरीशांप्रमाणेच कवी यशवंत यांनासुद्धा सांगलीकरच मानायला हवं. साधुदासाना ते गुरु मानत. गिरीशांचे सुपुत्र आणि नुकतेच निधन पावलेले सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांची जडणघडण सांगलीतच झाली. सुप्रसिद्ध समीक्षक 'श्रीकेक्षी' (श्री. के. क्षीरसागर) सांगलीचेच. अनेक समीक्षा - ग्रंथांबरोबरच 'तसवीर आणि तकदीर' हे त्यांचं आत्मचरित्र वैशिष्टयपूर्ण आहे. प्रसिद्ध लेखिका कमल देसाई आता सांगलीतच स्थायिक झाल्या आहेत. कवी-संगीतकार, अशोक जी. परांजपे सांगलीजवळील हरिपुरचेच. डॉ. वि. रा. करंदीकर, प्रा. गोविंद जोशी सांगलीचेच. प्रा. मालतीबाई किर्लोस्कर आता सांगलीतच स्थायिक झालेल्या आहेत. समतोल विचाराचे आणि ज्यांच्या साहित्य-समीक्षेचा दबदबा, अभ्या महाराष्ट्रात आहे ते प्रा. म. द. हातकणंगलेकर म्हणजे आजमितीला सांगलीमधील एक चालती- बोलती साहित्य-संस्थाच आहे. तेच लोककलेच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. डॉ. सुभाष भेंडे या नामवंत लेखकाची जडणघडण सांगलीतच झाली. सिटी हायस्कूल आणि विलिंग्डन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण सांगली आणि सांगलीकर.. .२२९