Jump to content

पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट आणखी काही सांगलीकर एखाद्या प्रिय व्यक्तिविषयी लिहिताना किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. तीच अवस्था प्रस्तुत लेखकाची सांगली या विषयासंदर्भात होते. सांगली आणि निवडक सांगलीकर यांच्या विषयी बरंच लिहून झाल्यावरही अजून सांगलीविषयी कितीतरी लिहायचं राहिलंय असं वाटायला लागतं ! असे अनेक सांगलीकर आहेत, सांगलीतील संस्था आहेत, प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांच्या विषयी नाही लिहायचं म्हणजे मनात एक अपराधी भावना निर्माण होते पण त्याचवेळी आर्थिक बाबीचाहि विचार नजरेआड करता येत नाही. तेव्हा त्या साऱ्या गोष्टींचा थोडक्यात परामर्श घ्यावा हे अत्तम. एक प्रकारे सांगलीचे हे कॅलिडिओस्कोपी दर्शनच ! सांगली हे काही पर्यटन स्थळ नव्हे. पण एखादा पाहुणा घरी आला की त्याला चार गोष्टी कशा आपण कौतुकाने दाखवतो त्याप्रमाणे सांगलीतील काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती या परिशिष्टात दिलेली आहे. सांगलीत अनेक नामवंत संस्था आहेत. काही शंभर वर्षाहून जुन्या म्हणून ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत तर काही गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, व्यापारी पेढ्या आहेत, व्यापारी, औद्योगिक संस्था आहेत तर काही कृषिविषयक संस्था आहेत. या विषयाला हात घातल्यावर लक्षात आलं की हा एका मोठ्या ग्रंथाचा विषय आहे ! एकट्या-दुकट्या माणसाला जमणारं हे काम नाही. मात्र पुरेसं आर्थिक पाठबळ आणि अवधी मिळाल्यास अवश्य पाठपुरावा करावा असा हा महत्वाचा विषय आहे. सांगलीच्या सर्वांगीण जडणघडणीची यथार्थ कल्पना त्यामुळे येऊ शकेल. प्रस्तुत लेखकाने काहीच संस्थांचा प्रातिनिधिकपणे विचार करुन, केवळ आर्थिक कारणांसाठी हा विषय नाईलाजाने अर्धवट सोडून दिला आहे. आता राहिले कर्तृत्ववान सांगलीकर. असे सांगलीकर अनेक आहेत. त्यासाठी पद्धतशीर अभ्यास आणि संशोधनच करण्याची आवश्यकता आहे. इथं नमूद होणारे सांगलीकर केवळ स्मृतीवर भरोसा ठेवून नोंदलेले असल्यामुळे, अनेकांचा नामोल्लेख न होण्याची शक्यता आहे. त्याचा संपूर्ण दोष सांगली आणि सांगलीकर... .२२८