पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भैरवी..., मंगेशकरी सुरांना अभिवादन करुन... अिथवर सांगलीच्या बावीस सुपुत्रांचं गुणगान मी केलं. एक प्रकारे वेगवेगळ्या थाटांच्या बावीस रागरागिण्यांचेच हे गायन होते. मैफलीची अखेर भैरवीने व्हावी असा संकेत आहे. भैरवीचे सूर छेडायला गवयाने सुरुवात केली की मैफलीत आपोआप एक प्रकारची अदासिनता पसरते. मनामनातून हुरहूर दाटून येते. हा काही नुसता भैरवीच्या आर्त सुरावटीचा परिणाम नसतो तर आता मैफल संपणार या दुःखाचीही जाणीव त्यामध्ये अंतर्भूत असते. तशीच काहीशी माझी अवस्था झाली आहे. या पुस्तकाचे स्वागत कसे होईल याची कल्पना नाही पण कर्तबगार सांगलीकरांचे स्तवन करण्याचा खटाटोप माझ्यापुरता तरी अत्यंत आनंददायी होता. गेली दोनतीन वर्षे मी त्यांच्याच सहवासात होतो म्हणानात. आता भैरवीसाठी कोणती चिज आळवायची हा माझ्यापुढं प्रश्न नव्हताच. सांगलीतील वास्तव्यानं सांगलीला धन्यता प्राप्त करुन देणारी, कीर्तीवान करणारी ती चिज ‘मंगेशकरी' सप्तसुरांचीच असणार होती. भारतीय संगीतात मंगेशकरी सूरमंडल हा एक विलक्षण चमत्कार आहे. असं आश्चर्य शतकातून एकदाच घडू शकतं. मा. दीनानाथ मंगेशकरांचा जन्म १९०० सालचा. २००० साल आता अलटून गेलं तरी त्यांची मुलं, नातवंडं, त्यांच्याच तडफेने गात आहेत. संपूर्ण शंभर वर्षे एकाच घरातील सुरांची मोहिनी आसेतू-हिमाचल असावी हा चमत्कार नव्हे तर काय ? म्हणून या गाणाऱ्या घराण्याला 'गंधर्व घराणे' म्हटलं जाते. कोणी 'मंगेशकर' आडनावाला एक मंत्रच संबोधतात. मा. दीनानाथ हा या गंधर्व घराण्याचा आद्यस्वर. मा. दीनानाथ, माई मंगेशकर आणि त्यांची पाच गुणवान मुलं या सर्वांचं मिळून एक सप्तसुरांचं अिंद्रधनुष्य निर्माण झालं. या मंगेशकरी सप्तसुरांमध्ये, माई मंगेशकरांचा समावेश मी मुद्दाम करतो. मा. दीनानाथांचं अकाली निधन झाल्यावर त्यांचे पंचप्राण असणाऱ्या, लता, मीना, आशा, भुषा आणि हृदयनाथ या पांचही सुरांना, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एकत्र बांधून ठेवण्याचं, बदसूर होऊ न देण्याचं मोठं काम माईनी केलंय. आणि सांगली नगरीचं परमभाग्य म्हणजे हे सप्तसूर एकाच वेळी सांगलीत निनादत होते. काही सूर बहरलेले होते. काही उमलत होते. काही उमलायचे. होते. मा. दीनानाथाचं ऐन अमेदीच्या काळात तब्बल १४ वर्षे सांगलीत वास्तव्य सांगली आणि सांगलीकर.. ..२२२