पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनेक बाबींबरोबर, दादाना ह्या नियमावलींचा पण त्रास झाला, भरीला मतलबी राजकारणाचे खेळ. त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस त्याना राजस्थानचे राज्यपालपद देऊन, महाराष्ट्रापासून दूर ठेवल्याने, दादाना नाही म्हटले तरी मनस्ताप झाला असणारच. कौटुंबिक कलहांनी तर त्यांचा पिच्छाच पुरवला होता. मधुमेहाचा त्रास वर्षानुवर्षे होता. या सर्वांचा परिणाम त्यांची प्रकृती ढासळण्यात झाला आणि अखेरीस १ मार्च १९८९ रोजी त्यांची जीवनज्योत मालवली. श्री. राजीव गांधी दादांच्या अंत्यदर्शनासाठी मुद्दाम सांगलीत आले. त्यांच्या अपस्थितीत लाखभर चहात्यांच्या अलोट गर्दीत कृष्णातीरी त्याना अखेरचा निरोप दिला गेला. दादांच्या जीवनाचे मूल्यमापन अनेकानी केलंय; अनेकजण पुढे करतील. पण त्यांचा सगळा जीवनपट बघितल्यावर अनेकाना वाटतं की हा नेक दिलाचा माणूस राजकारणाच्या दलदलीत निष्कारण अडकला. आपल्या आवडत्या विधायक कार्यातच गुंतून राहिला असता तर? ते काही असो. सांगलीकर जेव्हा कृष्णाकाठी फिरायला जातो तेव्हा सरकारी घाटावर अभे राहिल्यावर, डाव्या बाजूला राजेसाहेबांची समाधि आणि अजव्या बाजूला वसंतदादांची समाधी पाहून आणि सहा गल्लीवाल्या सांगलीचे आजचे स्वरुप लक्षात येऊन त्याच्या तोंडून सहजच अद्गार निघतील, "चिंतामणराये रचिला पाया वसंतराये कळस चढविला " 000 सांगली आणि सांगलीकर. ..२२१